शरद पवारांना पुण्यातील ‘या’ 3 मतदारसंघात मोठं चॅलेंज, राजकीय समीकरणं काय?

चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या शिलेदारांचा सामना महायुतींच्या उमेदवारांसोबत आहे. तीनही मतदारसंघांपैकी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात जास्त चुरशीच्या लढत होण्याची शक्यता आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना ऐनवेळी आयात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करावे लागले आहेत. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शरद पवारांना पुण्यातील 'या' 3 मतदारसंघात मोठं चॅलेंज, राजकीय समीकरणं काय?
शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 7:27 PM

चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शंकर जगताप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे हे रिंगणात आहेत. शंकर जगताप हे निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहेत. त्यांना अनुभव नसला तरी ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांना 1 लाख 50 हजार 723, अपक्ष राहुल कलाटे यांना 1 लाख 20 हजार 225 मते मिळाली होती. लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. जगतापांचा अकस्मात निधनानंतर देखील चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगतापांना 1 लाख 35 हजार 603, राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 99 हजार 435 आणि अपक्ष राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली होती. आश्विनी जगताप या विजयी झाल्या होत्या. सध्या देखील जगताप कुटुंबातील शंकर जगतापांच पारडे जड वाटत आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी बंडखोरीवर देखील बरंच काही अवलंबून असेल. बंडखोर नाना काटे यांनी माघार घेतल्यास शंकर जगताप यांना ही निवडणूक जड जाऊ शकते. यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. शंकर जगतापांना 100 टक्के विजयाची खात्री आहे.

भोसरी मतदारसंघात चित्र काय?

भोसरी विधानसभा मतदारसंघातील चित्र काही वेगळं नाही. राजकारणात कसलेले पैलवान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात शरद पवाराचे शिलेदार अजित गव्हाणे यांच आव्हान असणार आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 295, अपक्ष लढलेले माजी आमदार विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली होती. त्यामुळे महेश लांडगे यांचा विजय झाला होता. 2024 चे चित्र काही वेगळं आहे. अनेक राजकीय घडामोडी घडल्याने महेश लांडगे यांना सोपी वाटणारी भोसरी विधानसभा निवडणूक जड जाऊ शकते. तरीही दोन्ही उमेदवारांनी विजयाची खात्री व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

तीनही मतदारसंघात कुणी-कुणी केलीय बंडखोरी?

भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील बंडखोर काय भूमिका घेतात? यावर बरंच काही राजकीय गणित अवलंबून आहे. चिंचवडमधून महायुतीतून नाना काटे यांनी बंडखोरी केली आहे. पिंपरीमधून महाविकास आघाडीतून माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरीमधून महायुतीमधून चंद्रकांता सोनकांबळे, तर भोसरीमधून महाविकास आघाडीतून रवी लांडगे यांनी बंडखोरी केली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत-धर महाविकास आघाडीकडून आव्हान देणार आहेत. त्या पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. उच्चशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. 2019 मध्ये अजित पवारांचे विश्वासू असलेले अण्णा बनसोडे विजयी झाले होते. त्यांना 86 हजार 985 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांना 61 हजार 177 मते मिळाली होती. यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधूनच अण्णा बनसोडे यांना तीव्र विरोध झाला होता. या नाराजीचा फटका देखील आमदार अण्णा बनसोडे यांना बसू शकतो.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.