शरद पवारांकडून विधानसभ निवडणुकीची ‘पेरणी’; 3 दिवसात 11 शेतकरी मेळावे घेणार

Sharad Pawar Preparation For Maharashtra Vidhansabha Election 2024 : लोकसभेनंतर शरद पवार आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसतंय. शरद पवार आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. पवारांच्या बारामतीत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

शरद पवारांकडून विधानसभ निवडणुकीची 'पेरणी'; 3 दिवसात 11 शेतकरी मेळावे घेणार
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 4:58 PM

देशात नुकतंच लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. तर इंडिया आघाडीनेही चांगली कामगिरी केली. आता सगळ्यांना वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयार सुरु केली आहे. नुकतंच शरद पवारांनी दुष्काळी दौरा केला. त्यानंतर आता शरद पवार उद्यापासून पुन्हा बारामती दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार उद्यापासून 3 दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी शरद पवार स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी शरद पवार जाणून घेणार आहेत.

शरद पवारांचा पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद

लोकसभेनंतर शरद पवार विधानसभेच्या ‘पेरणी’ करत आहेत, असं म्हणयला हरकत नाही. कारण दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीत असणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. 3 दिवसात शरद पवार 11 शेतकरी मेळावे घेणार आहेत. शरद पवार पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहेत. याधी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी गावांचा दौरा केला होता. त्यानंतर उद्यापासून पवार पुन्हा दौऱ्यावर जाणार आहेत.

पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन काय?

शरद पवारांनी नुकतंच दुष्काळी दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार आहे. मात्र सध्याचं सरकार माझं किती ऐकेल हे माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य हातात पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जसं आपण साथ दिली तसंच आगामी विधानसभा निवडणुकीतही साथ द्यावी, अशी साद पवारांनी शेतकऱ्यांना घातली. त्यानंतर आता शरद पवार शेतकरी मेळावे घेणार आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का देणारा निकाल समोर आला. तर इंडिया आघाडीला मात्र आशा दाखवणारी स्थिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 तर महायुती 17 जागांवर विजय मिळवता आला. तर सांगलीची जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी जिंकली. त्यांनीही नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असल्याचं चित्र आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.