ईडीच्या धाडींचा, कारवायांचा त्रास होतो का,? शरद पवार, संजय राऊतांनी काय दिलं उत्तर
शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर आणि पूर्वीच्या राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांची आठवण सांगितल.
पुणेः राज्यातील राजकारणात रोज नवनवीन घटना घडत असतानाच पुण्यातील कार्यक्रमात आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलाखतीन राजकीय चर्चांना उधान आणले आहे. या कार्यकर्मादरम्यान शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना ईडीच्या धाडींच्या (ED Action) आणि कारवायांचा त्रास होतो का असा सवाल ज्यावेळी उपस्थित करण्यात आला, त्यावेळी शरद पवार यांनी अनेक मुद्यांना हात घालत भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.
ईडींच्या धाडींचा, कारवायांचा त्रास होतो का या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची तयारी चालू असतानाच ईडीची नोटीस मला मिळाली.
तुम्ही थांबा, कार्यालयात येऊ नका
ईडीची नोटीस आल्यानंतर शरद पवार यांनी विधानसभेच्या तयारीत असलेल्या आपल्या कार्यर्त्यांना त्यांनी सांगितले की, मला ईडीची नोटीस आली आहे, आणि आपण त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन यायचे आहे. त्यावेळी शरद पवारांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी फोन करुन सांगितले की, आपण तुमच्या कार्यालयात येत आहे, त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हात जोडत विनविणी केली तुम्ही थांबा, कार्यालयात येऊ नका. ही आठवण सांगताना कार्यक्रमात जोरदार हशा पिकाला.
या प्रश्नाचं उत्तर 2024 मध्ये देऊ
शरद पवारांना प्रश्न आणि त्यांची मुलाखत घेताना खासदार संजय राऊत यांनीही आपल्या राऊत स्टाईलनी उत्तर देत कार्यक्रमामध्ये रंगत आणली. त्यांनाही ईडीच्या धाडीविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले मात्र त्या उत्तरामुळे भविष्यातील राजकीय गणितं काय असू शकतात याचा अंदाज आता राजकीय विश्लेषक लावत आहेत. ईडींच्या धाडींचा, कारवायांचा त्रास होतो का या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रश्नाचं उत्तर 2024 मध्ये देऊ. या त्यांच्या उत्तरावरही जोरदार हशा आणि टाळ्या पडल्या.
राजकीय संस्कृतीवर भाष्य
या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर आणि पूर्वीच्या राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांची आठवण सांगितल.
युवकांना धर्माचं अमिष
महाविकास आघाडी सरकारचे अनेक भविष्य सांगितले मात्र ही महाविकास आघाडी योग्य मार्गावर असून देशात असा प्रयोग झाला तर भाजपला दूर ठेवता येईल असंही त्यांनी सांगितले. यावेळी ईडी, सध्याचे राजकारण, धर्म, जात आणि सोशल मीडियावरही बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या युवकांना धर्माचं अमिष दाखवून त्यांना भडकावण्याचं काम केलं जात आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं.