महाराष्ट्र विरुद्ध मुंबई, चंदू बोर्डे कप्तान, साताऱ्यात झालेल्या सामन्याची रंजक गोष्ट जी पवारांनी सांगितली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात माजी क्रिकेपटू चंदू बोर्डे यांच्या कार्याच्या सन्मान समारंभात बोलत असताना त्यांनी साताऱ्यात खेळवलेल्या मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्याचा एक किस्सा सांगितला.

महाराष्ट्र विरुद्ध मुंबई, चंदू बोर्डे कप्तान, साताऱ्यात झालेल्या सामन्याची रंजक गोष्ट जी पवारांनी सांगितली
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 9:46 PM

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात माजी क्रिकेपटू चंदू बोर्डे यांच्या कार्याच्या सन्मान समारंभात बोलत असताना त्यांनी साताऱ्यात खेळवलेल्या मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्याचा एक किस्सा सांगितला. (Sharad Pawar told story of cricket match between Mumbai vs Maharashtra played in Satara)

शरद पवार म्हणाले की, आता क्रिकेटच्या मॅचेस फक्त मुंबई आणि पुण्यात होतात, मात्र तेव्हा एक मॅच साताऱ्यात खेळवण्यात आली होती. चंदू बोर्डे हे महाराष्ट्राच्या संघाचे कर्णधार होते. मुंबईची टीम तेव्हा जोरदार होती. त्यावेळी मुंबईच्या बलाढ्य टीमला हरवण्याचं काम चंदू बोर्डेंच्या टीमनं केलं होतं.

…आणि महेंद्रसिंह धोनी भारताचा कर्णधार झाला

शरद पवार म्हणाले की, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना सुरु असताना राहुल द्रविड माझ्याकडे आला. मला म्हणाला मला कॅप्टन्सीमधून मुक्त करा आणि दुसऱ्या कोणाला तरी कर्णधारपद द्या. मी सचिनला बोलावलं, तेव्हा सचिनदेखील नाही म्हणाला. तेव्हा त्याने मला एक नावं सूचवलं, ते नाव म्हणजे महेंद्रसिंह धोनी. तो झारखंडमधून आलाय म्हणून त्याला कमी समजू नका. महेंद्रसिंह धोनीच्या नावाची सूचना ही सचिन तेंडुलकरने केली होती. त्यानंतर धोनी पुढे भारतीय क्रिकेटला मोठं योगदान देणारा क्रिकेटर बनला.

…तर नवे खेळाडू तयार होण्यास मदत होईल

चंदू बोर्डेंबद्दल पवार म्हणाले की, क्रिकेटच्या क्षेत्रात ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. खुपदा जोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळत असते तोपर्यंत लोकांच्या तोंडावर त्यांचं नाव असतं. मात्र, त्याचं करिअर संपल्यानंतर त्या खेळाडूकडे दुर्दैवानं पाहिलं जात नाही. पण मला अतिशय आनंद आहे की, पुणेकरांनी चंदू बोर्डे यांचं क्रिकेटमध्ये जे योगदान आहे, त्यांची नोंद घेऊन, त्याची आठवण ठेवून आज त्यांचा सन्मान केला. याच पद्धतीचा दृष्टीकोन ज्यांनी कुठल्याही खेळात योगदान दिलं त्याच्याबद्दल दाखवला तर नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल. भारताचं नावलौकिक या क्षेत्रात वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे.

क्रिकेटच्या क्षेत्रात मी वर्ल्ड क्रिकेटचा अध्यक्ष झालो त्याचं कारण मुंबई आहे. आधी मुंबई, मुंबईवरुन बीसीसीआय, बीसीसीआयवरुन एशियन क्रिकेट आणि तिथून आयसीसी. माझी सुरुवात तिथून झाली असल्या कारणामुळे माझी आस्था ही मुंबईसाठी कायम असणार आहे.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

उद्धवजींनी पत्र द्यावं, लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो : रावसाहेब दानवे

Defamation Case : शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा मिळणार, मीडिया प्लॅटफॉर्मचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचे आदेश

करुणा शर्मांचं ‘नो कमेंट’, तर वाल्मिक कराड म्हणतात ‘विषय संपला आता चला’, नेमकं काय घडतंय?

(Sharad Pawar told story of cricket match between Mumbai vs Maharashtra played in Satara)

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.