Pune Metro : पुणे मेट्रोच्या ‘कनेक्टिव्हिटी’ सुरु केला हा उपक्रम, आता मेट्रोस्थानकापर्यंत असे जाता येणार
Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन केले होते. त्यांनी उद्धाटन करुन आता आठवडा उलटला आहे. पुणेकरांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरुन समोर आले. आता प्रवाशांची दुसरी अडचणही दूर केलीय.

योगेश बोरसे, पुणे | 10 ऑगस्ट 2023 : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे पुणे मेट्रोचे दोन मार्ग पुणेकरांसाठी सुरु झाले. परंतु प्रवाशांना सर्वात मोठी अडचण मेट्रो स्थानकापर्यंत जाण्याची येत होती. अनेक मेट्रो स्थानकावर वाहनतळ नाही, तसेच सरळ बसची फिडर सेवाही नाही, यामुळे मेट्रो स्थानकावर जावे कसे, हा प्रश्न अनेकांना पडत होता. त्याला उत्तर मिळाले आहे.
काय सुरु केले
मेट्रोसाठी शेअर रिक्षा सुरु करण्याचा निर्णय झालाय. पुणे, पिंपरी चिंचवडमधील १८ स्थानकांपासून परिसरातील शेअर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केले आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी त्वरित सुरु करण्याचे म्हटले आहे. शेअर रिक्षांचे प्रवासी भाडे ठरवण्यासाठी पुणे रिक्षा पंचायत, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन आणि इतर सर्व संघटनांची बैठक झाली.




सर्वेक्षण करुन निर्णय
बैठकीनंतर शहरात सर्वेक्षण झाले. रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर शेअर रिक्षाचे भाडे जाहीर केले. आता दहा किलोमीटरपर्यंत शेअर रिक्षांची वाहतूक होणार आहेत. अनेक स्थानकांपर्यंत जाण्यासाठी बस सेवा नाही. तसेच मेट्रो स्थानकापर्यंत स्वता:च्या वाहनेने गेल्यास ते वाहन लावण्यासाठी वाहनतळ नाही. यामुळे प्रवाशांची अडचण होत होती.
असे असेल शेअर रिक्षाचे भाडे
वनाज | ११ ते २७ |
आनंदनगर | ११ ते ४३ |
आयडीयल कॉलनी | १२ ते ३७ |
नळस्टॉप | ११ ते २२ |
गरवारे कॉलेज | १२ ते १५ |
महापालिका भवन | १२ ते २७ |
शिवाजीनगर न्यायालय | ११ |
मंगळवार पेठ (आरटीओ) | ११ ते ३७ |
पुणे स्टेशन | ११ ते २१ |
रुबी हॉल | ११ ते ३० |
शिवाजीनगर एसटी स्थानक | ११ ते ३० |
बोपोडी | १४ ते ४९ |
दापोडी | १५ ते ३५ |
फुगेवाडी | २५ ते ३० |
कासारवाडी | १७ ते २५ |
भोसरी, नाशिक फाटा | १३ ते ३६ |
संत तुकारामनगर | १२ ते ३४ |
पिंपरी चिंचवड | १३ ते ७९ |