साईबाबांच्या तिजोरीतील दानात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट, एकूण जमा रक्कम तब्बल…
यंदा साईंच्या झोळीतील दानात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दान प्राप्त झालं आहे. (Shirdi Saibaba Donation In Last 14 Days)
अहमदनगर : दरवर्षी शिर्डीत ख्रिसमसची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो साईभक्त दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाही साईभक्तांनी बाबांना भरभरुन दान दिलं आहे. गेल्या 14 दिवसात दानपेटीत रोख 3 कोटी 17 लाखांचं दान अर्पण करण्यात आलं आहे. मात्र यंदा साईंच्या झोळीतील दानात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दान प्राप्त झालं आहे. (Shirdi Saibaba Donation In Last 14 Days)
कोरोना काळात साईबाबांना कोट्यावधींचं दान प्राप्त झालं आहे. गेल्या 14 दिवसात साईंच्या दानपेटीत रोख 3 कोटी 17 लाखांच दान अर्पण करण्यात आलं आहे. तर 93 ग्रॅम सोने आणि 4 किलोची चांदीचे दान प्राप्त झाले आहे. दरम्यान या दानात ऑनलाइनद्वारे मिळालेल्या दानाचा समावेश नाही.
नुकंतच श्री साई संस्थानाने 15 डिसेंबर ते 28 डिसेंबरदरम्यान आलेल्या दानाची मोजणी केली आहे. यानंतर ही माहिती समोर आली आहे. यापूर्वी साईबाबांना मिळालेल्या दानाची दर तीन दिवसाआड मोजणी केली जायची. पण आता तब्बल 14 दिवसांनंतर या दानाची मोजमाप करण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दान प्राप्त झालं आहे.
वर्षाअखेरीस शिर्डी साईमंदिर खुलं
दरम्यान वर्षाअखेरीस शिर्डी साईमंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या मागणीनंतर हे मंदिर खुलं ठेवलं जाणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक साई दरबारी येत असतात. त्या सर्व साईभक्तांना शिर्डी साईबाबा संस्थानाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र येत्या 31 डिसेंबरला रात्री 11.25 ते 11.55 या काळात शिर्डी साई मंदिर स्वच्छतेच्या कामासाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असलं तरीही 31 डिसेंबरला शेजारती आणि 1 जानेवारीला काकड आरती रद्द करण्यात आली आहे. (Shirdi Saibaba Donation In Last 14 Days)
संबंधित बातम्या :
शिर्डीत 8 लाख भक्तांकडून साईबाबांचं दर्शन, 11 दिवसात 16 कोटींपेक्षा अधिक दान
साईबाबांच्या तिजोरीत मागील वर्षीच्या तुलनेत 2 कोटींची वाढ, एकूण जमा रक्कम तब्बल…