भाजपसोबत जाताना टाळ्या वाजवत सही केली आणि आता…; अजित पवारांनी अमोल कोल्हेंना सुनावलं
Ajit Pawar on Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना जॅकेट आणि निष्ठेवरुन सुनावलं आहे. शिरूरमध्ये बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. अजित पवार यांनी शिरूरच्या सभेत नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर बातमी.....
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे गुलाबी जॅकेटवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना दिसतात. त्यांच्या या टीकेला आता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. शिरूर हवेली मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी शिरूरमध्ये सभा झाली. तेव्हा त्यांनी अमोल कोल्हेंना सुनावलं आहे. माझं जॅकेट गुलाबी कलरचे नाहीच तपासून घ्या. तुमचा चष्मा तुम्ही नीट तपासा. आजतर जॅकेट घातलेच नाही कोल्हेंवर टीका केली आहे. तुम्ही आमची निष्ठा काढवी? तुम्ही स्वत: तीन पक्ष बदलले. पाहिले शरद पवार यांच्यावर बोलले आणि नंतर उध्दव ठाकरे यांना मानाचा मुजरा केला. 2014 मध्ये तर काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस संपविण्याचा भाषा कोल्हे करत होते. कोल्हे सोयीचे राजकारण करत आहेत, असं अजित पवार म्हणालेत.
अमोल कोल्हेंवर निशाणा
अमोल कोल्हे आता आम्हाला निष्ठेची भाषा शिकवतात. अमोल कोल्हेला मीच पक्षात घेतलं. पक्षांतर झालं तेव्हा अशोक पवार आणि अमोल कोल्हेंनी सही करत टाळ्या वाजवल्या. जोरात झालं जोरात झालं असं म्हणाले. आता ही लोकं आता निष्ठेवर बोलत आहे, अशा शब्दात अजित पवारांनी अमोल कोल्हेंना सुनावलं आहे.
अशोक पवारांच्या मुलाबाबत अजित पवार काय म्हणाले?
अशोक पवार यांच्या मुलाला अपहरण करुन मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. निवडणूक काळात मुलाच्या प्रकरणाचा विरोधकांनी केल्याचा आरोप करुन भावनिक मुद्दा करु नका. घटनाक्रम वाचून दाखवत सत्य परिस्थिती सभेतून मांडत, अशी सुपिक कल्पना मांडून विरोधकांवर आरोप केला. मात्र यात आरोपीने स्वत: च्या फायद्यासाठी केल्याचे कबूल केलंय. या प्रकरणात ज्याची चूक असेल त्याला टायरमध्ये घ्या, असं अजित पवार म्हणाले.
शिरूर- जुन्नर परिसरात बिबट्याची दहशत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आता बिबट्याची भिती नाही. दिवसा लाईट मिळणार दिवसा शेतात काम करुन बायको मुलांसोबत घरात बसायचं. गप्पा मारायच्या आता बिबट्याची भीती राहाणार नाही. उगीच थापा मारत नाही, असं अजित पवार म्हणाले. तसंच घोडगंगा साखर कारखाना सुरु करण्याची अजित पवारांनी हमी दिली आहे.