Pune News | ललित पाटील प्रकरणात मंत्री दादाजी भुसे यांचा फोन…ससूनचे अधिष्ठाता प्रथमच स्पष्ट बोलले

Pune News | पुणे शहरातील ससून हॉस्पिटलमधून ड्रग्य माफिया ललित पाटील फरार झाला. त्यानंतर पुणे पोलीस आणि ससून हॉस्पिटलचे प्रशासन यांच्यावर चौफेर टीका होत आहे. या प्रकरणात मंत्री दादाजी भुसे यांचे नाव विरोधकांकडून घेतले जात आहे...

Pune News | ललित पाटील प्रकरणात मंत्री दादाजी भुसे यांचा फोन...ससूनचे अधिष्ठाता प्रथमच स्पष्ट बोलले
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 11:40 AM

पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच पुणे पोलिसांनी उघड केले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. सुमारे दोन कोटी रुपये किमत असलेले 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे ड्रग्स जप्त केले होते. या ड्रग्स प्रकरणात येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील होता. या ललित पाटील याच्यावर जून महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकरण उघड होताच तो पसार झाला.

शिवसेना आणि काँग्रेसचा आरोप

ललित पाटील प्रकरणावरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्यावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे. ललित पाटील याच्यासाठी फोन केल्याचा आरोप केला गेला. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे ही या प्रकरणास जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यामुळे या सर्व प्रकरणात महत्वाची भूमिका असलेले रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडून सातत्याने मौन पाळण्यात येते. आता प्रथमच त्यांनी या प्रकरणात मौन सोडले आहे.

काय म्हणाले अधिष्ठाता

ललित पाटील प्रकरणात सत्ताधारी पक्षाकडून दबाब होता का? कोणाचे फोन आले होते का? या विषयावर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी म्हटले की, मला कोणाकडून फोन आला नाही. तसेच आमच्यावर कोणाचाही दबाव नव्हता. आमचे डॉक्टर रुग्णांवर उपचाराचे काम करत होते. कोणत्याही रुग्णासंदर्भात आम्हाला कोणाचाही फोन आला नाही.

हे सुद्धा वाचा

ललित पाटील 2020 पासून येरवडा कारागृहात

ड्रग्स माफिया ललित पाटील याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑक्टोंबर 2020 मध्ये कारवाई करत अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर ललित पाटील येरवडा कारागृहात होता. परंतु जून महिन्यापासून तो ससूनमध्ये उपचार घेत होता. 30 सप्टेंबर रोजी पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा सहकारी सुभाष मंडल याला रूग्णालयाच्या गेटवर पकडले. त्याच्याकडून 2.14 कोटी रुपयांच्या 1.71 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले. ललित पाटील रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील एका कर्मचार्‍यामार्फत हे ड्रग्स देत होता. प्रकरण उघड झाल्यानंतर 2 ऑक्टोबरला एक्स-रेसाठी नेले जात असताना तो रुग्णालयातून फरार झाला.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.