Shivajirao Adhalarao Patil : ‘…त्यावेळी कोणाला निषेध करावासा वाटला नाही?’ शिवाजीराव आढळरावांचा शिवसेनेला घरचा आहेर

खेड पंचायत समिती इमारत शिवसेनेच्या सरकारमधून मिळालेल्या कामाचे क्रेडिट शिवसेनेला मिळू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेला खटाटोप शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण असल्याचा गंभीर आरोप शिवाजी आढळराव पाटलांनी करत राष्ट्रवादीच्या कारभाराला लक्ष्य केले.

Shivajirao Adhalarao Patil : '...त्यावेळी कोणाला निषेध करावासा वाटला नाही?' शिवाजीराव आढळरावांचा शिवसेनेला घरचा आहेर
शिवाजीराव आढळराव पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 9:59 AM

पुणे : शिवसेनेत आत्ता बंडखोरी झाली. पण अशी बंडखोरी दीड वर्षांपूर्वी झाली होती. खेड तालुक्यात झालेल्या बंडखोरीची दखल घेतली गेली नाही, अशी खंत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalarao Patil) यांनी व्यक्त केली. आपण पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो, याचे स्वागत आणि आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ते चाकणमध्ये (Chakan) बोलत होते. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीने राज्यातील राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांनी शिवसेना पक्षाला जेरीस आणले आहे. त्या पार्श्वभूमीवर आढळराव यांनी खेडमधील बंडखोरीची आठवण शिवसेनेला करून देत कोंडीत पकडले आहे. त्यावेळी दुदैवाने बंडखोरी करणाऱ्या गद्दारांचा निषेध करावा, अस वाटले नसल्याची खंत व्यक्त केली. राष्ट्रवादीवरही (NCP) त्यांनी यावेळी टीका केली.

‘शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण राष्ट्रवादी’

खेड पंचायत समिती इमारत शिवसेनेच्या सरकारमधून मिळालेल्या कामाचे क्रेडिट शिवसेनेला मिळू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेला खटाटोप शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण असल्याचा गंभीर आरोप शिवाजी आढळराव पाटलांनी करत राष्ट्रवादीच्या कारभाराला लक्ष्य केले.

दिलीप मोहिते नाराजी

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या ऐनवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दिलीप मोहिते पाटलांनी नाराजी व्यक्त करत मतदान करणार नसल्याचे सांगितले. तुमचे मतदान राष्ट्रवादीला, मग नाराजी मुख्यमंत्र्यांवर कशासाठी? तरी आपले नेते त्यांना फोन करून मतदान करण्यासाठी विनंती करत होते. आता आमच्या विरोधात खेड पंचायत समितीचे काम सुरू झाल्याची टीका त्यांनी दिलीप मोहितो पाटलांवर केली.

हे सुद्धा वाचा

‘राष्ट्रवादीचा शिवसेनेला फटका’

राज्यात राष्ट्रवादीचा सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसल्याचा गंभीर आरोप शिवाजी आढळराव पाटलांनी केला. राज्यात 150 ते 200 जीआर काढलेत. ऐवढेच नाही, तर पुणे जिल्ह्याच्या DPDCचा 170 कोटींचा निधी एकतर्फी राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांना वाटपही केला. असे 178 कोटीचे प्रस्ताव मान्यतेला गेलेत. मात्र हा निधी वाटप करताना शिवसेनेला मात्र डावलण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारभारावर टीका करत आता आम्ही सहन तरी किती करायचे, असा सवाल केला आहे.

‘महाविकास आघाडीला विरोध नाही, पण…’

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना पुणे जिल्ह्यात मात्र शिवसेनेला संपविण्याचा डाव टाकला जात असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीला विरोध नाही, मात्र आम्हाला आता जगू द्या, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

‘वार्ड रचना राष्ट्रवादीच्या सोयीची’

पुढच्या काळात निवडणुकीला सामोरे जात असताना पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद वार्ड रचना राष्ट्रवादीला सोयीच्या असतील, अशाच करण्यात आल्यात. मग आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेवर असाही अन्याय केला जात आहे, अशी नाराजी भर सभेत त्यांनी व्यक्त केली.

टीका करताना काय म्हणाले शिवाजीवार आढळराव?

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.