Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊत बोलले, अहिर भेटले, उद्धव ठाकरेही बोलले, पण राहुल कलाटे यांचा निर्णय नाही; आघाडीचं टेन्शन वाढलं?

अर्ज मागे घ्यायला अजून तीन तास आहेत. कलाटे यांना त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. त्यानंतर ते निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. तर, उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली.

राऊत बोलले, अहिर भेटले, उद्धव ठाकरेही बोलले, पण राहुल कलाटे यांचा निर्णय नाही; आघाडीचं टेन्शन वाढलं?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 12:23 PM

पुणे: राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी कलाटे यांच्याशी चर्चा केली. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी कलाटे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. त्यानंतरही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे तीन तास बाकी असून कलाटे यांनी अद्यापही कोणताही निर्णय न घेतल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कलाटे यांच्याशी काल फोनवरून संवाद साधला होता. त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनीही अर्ज मागे घेण्याची कलाटे यांना विनंती केली. मात्र, कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे आमदार सचिन अहिर मुंबईहून थेट चिंचवडला पोहोचले. त्यांनी तब्बल अर्धा तास कलाटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चाही करून दिली. मात्र, तरीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही.

चर्चा सकारात्मक

कलाटे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सचिन अहिर यांनी मीडियाशी संवाद साधला. कलाटे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली आहे. या चर्चेवर मी समाधानी आहे. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं. काल विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्याशीही बोलणं झालं. ते अर्ज मागे घेतील असं आम्हाला काल वाटलं होतं.

पण त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे मी चिंचवडला आलो. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कलाटे यांनी थोडा वेळ मागून घेतला आहे. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. ते सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आहे, असं सचिन अहिर म्हणाले.

चिंचवडसाठी आग्रही होतो

कलाटे यांनी मागच्या निवडणुकीत प्रचंड मते घेतली होती. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांना भारिपसह अनेक पक्षांचा पाठिंबा होता. आता चित्र पालटलेलं आहे. आम्ही चिंचवडसाठी आग्रही होतो. तशी मागणीही आम्ही केली होती.

संजय राऊत यांनी तर ही जागा शिवसेनेला सुटल्यास कलाटे यांना उमेदवारी देऊ असं जाहीरही केलं होतं. पण महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या पारड्यात गेली. त्यामुळे कलाटे यांना उमेदवारी मिळू शकली नाही, असं अहिर म्हणाले.

कलाटे काय म्हणाले?

अर्ज मागे घ्यायला अजून तीन तास आहेत. कलाटे यांना त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. त्यानंतर ते निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. तर, उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली. मला उद्धव ठाकरे यांचा अनादर करायचा नाही. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी निर्णय घेणार आहे, अशी सूचक प्रतिक्रिया कलाटे यांनी व्यक्त केली.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.