धक्कादायक ! पिंपरीत आपटी बॉम्बबरोबर खेळताना एका 4 बालिकेचा मृत्यू , दोन जखमी
मुले त्या बॉल सदृश्य वस्तूबरोबर खेळत असताना तो बॉल(आपटी बॉम्ब ) खाली पडला आणि फुटला यामध्ये राधा नावाची चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तिची मृत्यू झाला. या घटनेत तिच्या सोबत खेळत असलेल्या अन्य दोन लहानमुलेही या घटनेत जखमी झाले आहेत.
पिंपरी – पिंपरी चिंचवड मधील दिघी परिसरात मासे किंवा श्वान मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या स्फोटकाबरोबर(आपटी बॉम्ब)(Explosive) खेळताना एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू(4 year girl child death) तर दोन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार वर्षीय राधा या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरती आणि राजू नावाचे लहान मुले जखमी झाली आहेत. या मुलांना कचऱ्यातून ही स्फोटके मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राजस्थान (Rajsthan )येथून दिघी येथे मृत मुलीचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी आले असून, कुटुंबीय जनावरांच्या गोठ्यात काम करतात. घटनेच्या दरम्यान मृत मुलगी व अन्य मुले खेळत होती.
नेमकं काय घडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी- चिंचवडमधील दिघी येथे आपटी बॉम्ब फुटल्याने एका लहान मुलीची मृत्यू झाला आहे तर अन्य दोन लहान मुले जखमी झाली आहेत. राजस्थान येथून दिघी येथे मृत मुलीचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी आले असून, कुटुंबीय जनावरांच्या गोठ्यात काम करतात. घटनेच्या दरम्यान मृत मुलगी व अन्य मुले खेळत होती. खेळत असताना त्यांना कचऱ्यात बॉल सदृश्य वस्तू दिसल्या. त्यानंतर मुलीनी त्या वस्तू घरी आणत गोठयात ठेवल्या. आज घटनेच्या दरम्यान आज सकाळी दूध घेऊन मुलांचे वडील बाहेर गेले होते. त्याच दरम्यान मुले त्या बॉल सदृश्य वस्तूबरोबर खेळत असताना तो बॉल(आपटी बॉम्ब ) खाली पडला आणि फुटला यामध्ये राधा नावाची चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तिची मृत्यू झाला. या घटनेत तिच्या सोबत खेळत असलेल्या अन्य दोन लहानमुलेही या घटनेत जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटना स्थळावर धाव घेत घटना स्थळाची पाहणी केली. गोठ्यात असलेले आपटी बॉम्ब लिसांनी ताब्यात घेतले आहेत . या परिसरात आपटी बॉम्ब नेमके आले कुठून? नेमका काय प्रकार आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
Photo | एसटी चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला! भररस्त्यात आगडोंब, एसटी जळून खाक
Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?