मी हाडाचा शिवसैनिक… दोन वर्षांपासून आजारी…पैसा नाही…ही हाक ऐकून कोण आला मदतीसाठी धावून

shiv sainik : मी हाडाचा शिवसैनिक आहे. गेल्या दोन वर्षापासून आजारी आहे. औषधोपचाराला पैसा नाही. मला मदत करा, अशी आर्त हाक एका शिवसैनिकाने केली. त्याला प्रतिसाद देत त्याचा उपचाराचा सर्व खर्च उचला..कोणी केली त्यांना मदत...

मी हाडाचा शिवसैनिक... दोन वर्षांपासून आजारी...पैसा नाही...ही हाक ऐकून कोण आला मदतीसाठी धावून
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 8:56 AM

सागर सुरवसे, सोलापूर : शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे दोन गट पडले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही आपले सवतेसुभे उभारले. मात्र, या फुटीत होरपळला गेला तो सामान्य शिवसैनिक. त्याला कोणता झेंडा हाती घ्यावा, असा प्रश्न पडलेला आहे. मराठी माणसासाठी उभी राहिलेली शिवसेना कधीही त्याच्यासाठी हक्काने उभी राहायची. त्यांच्या सुख-दु:खात शिवसेना नेते धावून जायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. शिवसैनिकाला मदत मिळताना दिसत नाहीये. दोन वर्षापासून अंथरूणाला खिळून असलेल्या एका शिवसैनिकाची कैफियत मांडली…अन् त्याच्यासाठी धावून आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…अन् ठाकरे गटही…

कोणी दिली आर्त हाक…

सोलापुरातील एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर यांनी शिवसेनेकडे औषध उपचाराच्या मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. त्यांची बातमी Tv9 मराठी’ने दाखवली. त्या बातमीनंतर सोलापूरातील बेडवर खिळलेल्या शिवसैनिकाचा पूर्ण आरोग्याचा खर्च ठाकरे गट करण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

शिवसैनिक अरुण कामतकर यांच्या घरी ठाकरे गटाकडून डॉक्टर गेले. त्यांची घरातच तपासणी केली. त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी घेऊन जाणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी ‘tv9 मराठी’च्या बातमीनंतर शिवसैनिकांना अरुण कामतकर यांच्या घरी पाठवले. कामतकर यांच्या इच्छेनुसार सोलापुरातील आयुर्वेदाचार्य डॉ. शिवरत्न शेटे यांच्याकडे त्यांचा संपूर्ण उपचार करण्यात येणार आहे.

शिंदे यांनी केला संपर्क, दिली मदत

‘TV9 मराठी’च्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. शिवसैनिक अरुण कामतकर यांना मुख्यमंत्र्यांनी रोख 1 लाखाची मदत दिली आहे. तसेच उपचाराचा पूर्ण खर्च ही उचलणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकाशी रात्री 12 वाजता व्हिडिओ कॉलवर संवाद साधत विचारपूस केली. शिवसैनिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना आर्त हाक दिली होती. एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर यांना कोणतीही काळजी करू नका आम्ही सर्व मदत करू, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

मणक्याचा आजार

एसटी कामगार सेनेचा विभागीय सचिव अरुण कामतकर मणक्याच्या समस्येमुळे दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. मी एसटी कामगार सेनेचा विभागीय सचिव म्हणून 5 वर्षे काम केले. मात्र आता मी अडचणीत आहे. माझ्या अडचणीच्या काळात शिवसैनिकाला मदत करा, ही विनंती आहे, असे आवाहन कामतकर यांनी केले होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.