पुण्याच्या बहुप्रतिक्षित ‘जायका’ प्रकल्पासाठी 6 कंपन्यांच्या निविदा, शहरातल्या सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

मुळा-मुठा नद्यांच्या (Mula Mutha River) शुद्धिकरणासाठी आणि शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया (Sewage Treatment) करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जायका (JICA Project) प्रकल्पासाठी 6 मोठ्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. सर्व कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सर्वात कमी रक्कम कोणत्या कंपनीने प्रस्तावित केली आहे हे स्पष्ट होणार आहे.

पुण्याच्या बहुप्रतिक्षित 'जायका' प्रकल्पासाठी 6 कंपन्यांच्या निविदा, शहरातल्या सांडपाण्यावर होणार प्रक्रिया
मुळा-मुठा नदी, पुणे
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 12:46 PM

पुणे : मुळा-मुठा नद्यांच्या (Mula Mutha River) शुद्धिकरणासाठी आणि शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया (Sewage Treatment) करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जायका (JICA Project) प्रकल्पासाठी 6 मोठ्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. जायका प्रकल्पासाठी निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर सहा कंपन्यांनी या प्रकल्पासाठी रस दाखवल्याचं समोर आलं आहे. सर्व कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सर्वात कमी रक्कम कोणत्या कंपनीने प्रस्तावित केली आहे हे स्पष्ट होणार आहे. पण छाननी होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (Six companies have submitted tenders for the Jica project of water purification in Pune)

वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकल्प 6 वर्षांपासून कागदावरच

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धिकरण प्रकल्पाअंतर्गत अकरा मैलापाणी शुद्धिकरण केंद्रे उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. जपानच्या जायका कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’ने (जायका) अल्प व्याजदराने कर्ज दिलं आहे. हे कर्ज केंद्र सरकार फेडणार आहे.

2015 मध्ये हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण वेगवेगळ्या कारणांमुळे हा प्रकल्प सहा वर्षांपासून कागदावरच आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत गेला आहे.

एक महिन्याचा कालावधी लागणार

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सहा कंपन्यांनी महापालिकेच्या प्रक्रियेला प्रतिसाद देत निविदा भरल्या आहेत. या कंपन्यांची कागदपत्र दिल्ली आणि चेन्नईहून पुण्यात आणली गेली आहेत. तांत्रित मूल्यांकनासाठी ही सगळी कागदपत्रं प्रकल्पाच्या सल्लागाराकडे देण्यात आली आहेत. त्यानंतर ही कागदपत्रं सल्लागार समितीसमोर ठेवली जातील. या समितीने निर्णय घेतल्यानंतर आर्थिक निविदा उघडण्यात येतील. या प्रक्रियेला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो.

या आहेत कंपन्या

मे. टाटा प्रोजेक्ट्स प्रा. लि. आणि पी. अँड सी. प्रोजेक्ट्स कन्सोरशिअम मे. एनव्हायरो कंट्रोल आणि तोशिबा वॉटर सोल्यूशन्स जेव्ही मे. व्ही. ए. टेक वाबाग आणि पी. सी. आय. एल-जेव्ही मे. एल अँड टी आणि के. आयपीएल जेव्ही मे. जेएमसी आणि मेटीटोव अल्के जेव्ही मे. जे. डब्लू. आय. एल. आणि एसएसजी आणि एसपीएम जेव्ही

संबंधित बातम्या :

पुण्यात ई-चलनचा दंड 77 कोटी, वसूल झाले फक्त 10 कोटी; तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना?

पुण्यात घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरूवात, अंथरुणाला खिळलेल्यांना मिळणार कोरोना लस, असा करा अर्ज

Job Alert | पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये भरती, काय आहे पात्रता? असा करा अर्ज

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.