अखेर ठिणगी पडली! राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरात; भाजप बंदमध्ये सहभागी असणार की नाही?

पिंपरी चिंचवडमध्ये विविध संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या बंदला भाजपचा पाठिंबा नसणार आहे.

अखेर ठिणगी पडली! राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद 'या' शहरात; भाजप बंदमध्ये सहभागी असणार की नाही?
राज्यपालांच्या विरोधातील पहिला बंद 'या' शहरात होणार; भाजपचा बंदमध्ये सहभागी होणार की नाही?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 10:46 AM

पिंपरी चिंचवड: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच स्तरातून राज्यपाल हटावच्या मागणीने जोर धरलेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आझाद मैदानावर विराट मोर्चाची हाक दिली आहे. राज्यपाल हटवण्यासाठीच्या राजकीय हालचाली सुरू असतानाच पिंपरी चिंचवडमधील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. येत्या 8 तारखेला हा बंद पुकारण्यात येणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात सुरू असलेला विरोध अजून ही संपताना दिसत नाही. आता पिंपरी चिंचवडमधल्या सर्व संघटनांनी एकत्र येत येत्या 8 तारखेला पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पिंपरी चिंचवडमध्ये विविध संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या बंदला भाजपचा पाठिंबा नसणार आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने सात दिवस राज्यात आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पहिलं आंदोलन मंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबाद येथील घरासमोर केलं. मराठा क्रांती मोर्चाने ढोल वाजवत राज्यपाल हटावचा नारा दिला. काळी टोपी हाय हाय, राज्यपाल हटवलेच पाहिजे, अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

यावेळी सावे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांचं निवेदन स्वीकारलं. तसेच तुमचं निवेदन पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था मी करतो, असं सावे म्हणाले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.