मुलीच्या लग्नात बापाकडून 750 केशर आंब्याच्या रोपांचे वाटप, वृक्षसंवर्धनाचा संदेश देत घडवला आदर्श
मुलीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नात 750 केशरी आंब्याच्या रोपट्याचे वाटप करुन वृक्षारोपणाचा संदेश देत प्रत्येकाला वृक्ष संवर्धनाची शपथ दिली
सोलापूर : लग्नसमारंभ म्हंटला की लोकांच्या हौसेला मोल नसतो, असं म्हणतात (Distribution Of Mango Plant). त्यामुळे पैशांचा चुराडा आलाच. त्यातल्या त्यात लग्नसमारंभासाठी मान्यवरांच्या स्वागताला आणि सत्काराला हजारो रुपये खर्च करण्याची जणू प्रथाच पडली आहे. मात्र, याला फाटा देत मानेगावात रघुनाथ पारडे या मुलीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नात 750 केशरी आंब्याच्या रोपट्याचे वाटप करुन वृक्षारोपणाचा संदेश देत प्रत्येकाला वृक्ष संवर्धनाची शपथ दिली (Distribution Of Mango Plant).
माढा तालुक्यातील मानेगावातील शितल रघुनाथ पारडेचा कापसेवाडीच्या भरत भिवाजी कापसे या शेतकऱ्याच्या नवदाम्पत्याचा आगळावेगळा विवाह सोहळा माढा तालुक्यातील मानेगावात थाटामाटात पार पडला. वधु पती रघुनाथ पारडे यांनी अन्नपुर्णा फांउडशेनचे मारुती शिंदे, सुशील पारडे यांच्या मार्गदर्शनातून हा अभिनव उपक्रम राबविला गेला. शितल आणि भरत या नवदामपत्याने देखील सहमती दर्शवली.
आंब्याच्या रोपट्याचे वाटप
हार, तुरे, फेटे देत लग्नात आलेल्या पाहुणे-मान्यवरांना सत्कार करण्यासाठी हजारो रुपयांचा चुराडा होतो. सत्काराच्या खर्चाला बगल देऊन लग्नाला आलेल्या वऱ्हाडी, पै पाहुण्यांसह मान्यवर या सर्वांनाच वधुचे वडील रघुनाथ पारडे आणि आई सविता या दोघांनी लग्न मंडपाच्या प्रवेशद्वारासमोर थांबून आंब्याच्या रोपट्याचे वाटप करुन आदर्श घडवला. हे इतरांसाठी तो अनुकरणीय असाच आहे. अशा उपक्रमांचा इतरांनी देखील अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे नवदाम्पत्याने सांगितले (Distribution Of Mango Plant).
वेळेचा अपव्यय आणि पैशांची होणारी नासाडी टाळत पारडे कुटुंबियांचा पर्यावरण संवर्धनासाठीचा उपक्रम आदर्शवान असल्याचे ग्रामस्थ मारुती शिंदे, सुशील पारडे यांनी बोलताना सांगितले. उपक्रमाचे कौतुक करत विवाह सोहळ्यास सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
लातूरच्या हॅप्पी इंडियन व्हिलेजवर अनोखा लग्नसोहळा, एचआयव्ही संक्रमित मुलांचा सत्यशोधक विवाहhttps://t.co/DdIGBjY7CD#latur | #RavikantBapatle | #Happyindianvillage | #hasegaon
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
Distribution Of Mango Plant
संबंधित बातम्या :
VIRAL VIDEO | नवरीचा ‘क्लोजअप’ फोटो काढायला गेला अन्…., नवरीच्या रिॲक्शनवर नेटिझन्स फिदा