सोलापुरात हॉटेल कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, हरवलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी ग्राहकाच्या स्वाधीन
हॉटेलमध्ये सापडलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी जाधव या हॉटेलमधील कर्मचाऱ्याने विवेक जबडे या ग्राहकाला परत दिली आहे.
सोलापूर : सध्याच्या स्वार्थी युगात प्रामाणिकपणा हा क्वचितच पहायला मिळतो (Solapur Honest Waiter). अशाच एका प्रामाणिकपणाचे दर्शन माढ्यातील हॉटेल कर्मचाऱ्याने दाखवुन दिलं आहे. हॉटेलमध्ये सापडलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी जाधव या हॉटेलमधील कर्मचाऱ्याने विवेक जबडे या ग्राहकाला परत दिली आहे. सचिन जाधवच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे (Solapur Honest Waiter).
माढ्यातील विवेक भारत जबडे हे शहरातील हॉटेल अभिराजमध्ये मित्र परिवारासोबत जेवायला गेले होते. जेवण आटपुन हॉटेलमधून घरी गेल्यानंतर जबडे यांना बोटातील सोन्याची अंगठी दिसुन आली नाही. त्यांनी घरात शोधा शोध केली मात्र ती काही सापडली नाही.
हॉटेलमध्ये जाऊन विचारपूस केली असता हॉटेल मालक सचिन चवरे, सोमनाथ चवरे यांनी अंगठी सचिन जाधव या कामगाराला सापडली असल्याचे सांगितले. ओळख अन् खातर जमा केल्यानंतर कर्मचारी जाधव यांच्या हस्ते जबडे यांच्याकडे त्यांची अंगठी परत देण्यात आली. जाधव यांच्या प्रामाणिकपणा बद्दल जबडे यांनी मित्र परिवाराच्या हस्ते सन्मान करुन कौतुक देखील केले.
आजच्या कलियुगात सारं काही विकत घेता येतं असं म्हणतात. पैशाने वस्तू विकत घेता, मात्र सद्गुण घेता येत नाही. या सद्गुणांना सोबत घेऊन जगणारी माणसं जरी दुर्मिळ होत चालली असली तरी अशा माणसांच्या चागुलपणांचं ज्या-ज्या वेळी दर्शन घडते, तेव्हा सारा समाज आपसुकच सलाम करतो (Solapur Honest Waiter).
सचिन जाधव हे विवेक जबडे यांचा टेबल पाहत होते. जेवण आटपुन गेल्यानंतर जाधव हे टेबल आणि खोली साफ करत असताना त्यांना बेसिनच्या कोपर्यात अंगठी दिसुन आली. ती घेऊन ते हॉटेल मालकांना याची कल्पना दिली. जबडे येताच जाधव यांनी ओळख पटवून अंगठी त्यांना परत केली.
सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, 24 लाख रुपयांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन, पोलिसांकडून सत्कारhttps://t.co/1yQRCWjeql @NagpurPolice #nagpur
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
Solapur Honest Waiter
संबंधित बातम्या :
एसटी चालक-वाहकचा प्रामाणिकपणा, 60 हजार रुपयांनी भरलेली पर्स प्रवाशाला परत