विवाहबाह्य संबंधाला मुलाचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच काटा काढला

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या जन्मदात्या मुलाचाच आईने तिच्या प्रियकराने केला.

विवाहबाह्य संबंधाला मुलाचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच काटा काढला
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 11:35 AM

सोलापूर : विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या जन्मदात्या मुलाचाच आईने तिच्या प्रियकराने काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. सिद्धेश्वर सुभाष जाधव असं हत्या झालेल्या तरुणांचं नाव आहे तर मुक्ताबाई सुभाष जाधव असं हत्या करणाऱ्या कसाईचं नाव आहे. (Solapur mother murdered the child with the help of her boyfriend)

माढा तालुक्यातील परितेवाडी शिवारात 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर सिद्धेश्वर सुभाष जाधव याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचं समोर आलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या पोटच्या पोराचा खून आईने तिचा प्रियकर महादेव कदम याच्या मदतीने केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

माढा तालुक्यातील परितेवाडी शिवारात 25 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर सुभाष जाधव या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. टेंभुर्णी पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यावरून तसंच गुप्त माहितीच्या आधारे यासंदर्भात तपास करून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.

गुरुवारी मध्यरात्री आईने आणि तिच्या प्रियकराने सिद्धेश्वर याच्या डोक्यात दगड घालून झोपेतच त्याचा खून केला. आणि तो मृत झाल्याची खात्री मिळतात काठीच्या साहाय्याने झोळी करून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह चारीत फेकून दिला. त्यानंतर रक्ताने माखलेले कपडे त्यांनी जाळून टाकले तसंच रक्ताळलेली जागा साफ करुन घेतली.

तपास करताना त्यांना जेव्हा  संशयाची सुई मुक्ताबाई जाधव हिच्याकडे आल्यानंतर तिला ताब्यात घेऊन घटनेची माहिती घेतली असता सारा प्रकार समोर आला. या घटनेनंतर महादेव कदम हा फरार होता मात्र ग्रामीण पोलिसांनी उंबरे पागे येथून त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सोलापूर ग्रामीणचे टेंभुर्णी पोलिस करत आहेत.

(Solapur mother murdered the child with the help of her boyfriend)

संंबंधित बातम्या

मुंबई: चोरीच्या संशायमुळे बेदम मारहाण करत तरुणाची हत्या, 6 जणांना अटक

पाच घटनांनी महाराष्ट्र हादरला, कुठे हत्या, कुठे आत्महत्या, बघा तुमच्या शहरात काय घडतंय?

क्रिकेट सामन्यात राडा, MIM च्या नेत्याचा गोळीबार, एकाचा मृत्यू

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.