AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरोडेखोराला पळवण्यासाठी वडिलांसह कुटुंब एकवटलं, पुण्यात पोलिसांच्या गाडीला भररस्त्यात धडका

आरोपी अमोल दत्तू सावंत याने सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावी तीन महिन्यांपूर्वी दरोडा टाकला होता. (Robbery Car Police Vehicle Indapur Pune)

दरोडेखोराला पळवण्यासाठी वडिलांसह कुटुंब एकवटलं, पुण्यात पोलिसांच्या गाडीला भररस्त्यात धडका
पोलिसांच्या वाहनाला धडका
| Updated on: May 21, 2021 | 11:58 AM
Share

इंदापूर : सोलापूर जिल्ह्यात दरोडा टाकल्यानंतर तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे जिल्ह्यात अटक करण्यात आली. मात्र इंदापूर तालुक्यातील सुगावहून सोलापूरला घेऊन जात असताना आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या गाडीला चार ते पाच वेळा धडक देऊन नातवेाईकांनी हल्ला चढवला. या फिल्मी स्टाईल थरार नाट्यानंतर अखेर पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Solapur Robbery Amol Sawant Family Car Hits Police Vehicle in Indapur Pune)

कोण आहे आरोपी?

आरोपी अमोल दत्तू सावंत याने सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावी तीन महिन्यांपूर्वी दरोडा टाकला होता. मात्र या गुन्ह्यात तो फरार होता. सोलापूर जिल्ह्याचे पोलिस त्याला शोधत इंदापूर येथील सुगाव या ठिकाणी आले. पोलिसांनी तिथून आरोपीला ताब्यात घेतले.

नातेवाईकांच्या गाडीकडून पाठलाग

टेंभूर्णीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांच्यासह इंदापूरच्या पोलिसांचाही यात समावेश होता. यानंतर आरोपीला पोलिस खासगी वाहनात घेऊन निघाले. शिरसोडी-इंदापूर रस्त्याने जात असताना पोलिसांच्या गाडीचा एसयूव्ही मॉडेलची पांढर्‍या रंगाची एम एच 12 एएच 2515 या नंबरची गाडी फिर्यादींच्या गाडीचा पाठलाग करत आली.

माळवाडी नं 1 येथील पोलिसांच्या खासगी गाडीला पाठलाग करणाऱ्या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. चार ते पाच वेळा धडक देऊन पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींच्या नातेवाईकांनी आरोपी अमोल सावंत याला पोलिसांच्या ताब्यातून सिने स्टाईलने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

नातेवाईकांवर गुन्हे

फिल्मी स्टाईल थरार नाट्यात अखेर पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. दत्तू नारायण सावंत, रोहन दत्तू सावंत, अमोल दत्तू सावंत, उर्मिला दत्तू सावंत, शर्मिला दत्तू सावंत, सुरेखा दत्तू सावंत अशी आरोपींची नावं असून सर्व सुगावचे रहिवासी आहेत. इंदापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

 ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहोनीची एक्स्प्रेस वेवर लूट

अखेरच्या घटका मोजणाऱ्या नवऱ्यासमोरच महिलेचा कम्पाऊण्डरकडून विनयभंग

(Solapur Robbery Amol Sawant Family Car Hits Police Vehicle in Indapur Pune)

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.