Pimpri Chinchwad | प्रसिद्धी व लक्ष वेधण्यासाठी मोठ्या मोठ्या व्यक्तींवर आरोप करायची सोमय्या यांना सवय – जयंत पाटील
आगामी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची होईल . महापालिका निवडणुकीत आघाडी संदर्भात आमची पहिली पसंती महाविकास आघाडी मधील पक्ष एकत्र आले पाहिजे ही असणार आहे,कुठं अवास्तव मागण्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू
पिंपरी – ‘प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या मोठ्या व्यक्तींवर आरोप करायची सोमय्या यांना सवय असल्याचा टोला महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील(jayant Patil) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांना लगावला आहे. नवाब मालिका यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांला उत्तर देताना त्यांनी ही टीका केली आहे. सर्व प्रकार उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातल्या निवडणुका लक्षात घेऊन केवळ लक्ष वेधण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरीत(Pimpri Chinchwad) काँग्रेस कार्यकर्त्याच्या भेटीसाठी नाना पटोल्यांच्या उपस्थितीत राहिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. या परिसंवाद यात्रेसाठी पिंपरीत उपस्थित असताना जयंत पाटील यांनी ही टीका केली आहे.
मराठा आरक्षाणाचा विषय केंद्राकडे
मराठा समाजाच्या अनेक मागण्या अद्याप पुर्ण न केल्याने खासदार संभाजी राजे छत्रपती हे उपोषणाला बसले आहेत . त्यांच्या या उपोषणाला. राज्यातील अनेक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. याविषयी या बोलताना ते म्हणाले ,की मराठा आरक्षणचा विषय आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, आणि आता त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून यावर मार्ग काढणे गरजेचे झालंय, त्यामुळे छत्रपती संभाजी राजेंनी त्यांच्या आंदोलनाचा विचार करावा असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची
आगामी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची होईल . महापालिका निवडणुकीत आघाडी संदर्भात आमची पहिली पसंती महाविकास आघाडी मधील पक्ष एकत्र आले पाहिजे ही असणार आहे,कुठं अवास्तव मागण्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास हे जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
एमपीएससी अध्यक्षांच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी, कशा पार पडल्या परीक्षा?
Success Story : शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!