SSC Result 2023 : आईवडिल मजूर कामगार, मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळविले ९७ टक्के
विद्यार्थीनीचे आईवडिल लातूर कायम रोजगार मिळत नसल्यामुळे कुटुंबाच्या उपजिविकेसाठी आळंदी येथे काही आले आहेत. त्यांना आळंदी येथे येऊन कित्येक वर्षे झाली आहेत.
आळंदी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने चार दिवसांपुर्वी दहावीचा निकाल (SSC Result 2023) जाहीर केला. त्यामध्ये यावर्षी सुध्दा मुलींनी बाजी मारली, कोकण विभाग (kokan division) सगळ्या विभात अव्वल ठरला. तर नागपूर विभागाचा निकाल घसरला. राज्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. म्हणजे त्या शाळेतील एकही विद्यार्थी (student) नापास झालेला नाही. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के असल्याचं बोर्डाने जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविल्यामुळे पालकवर्ग देखील खूष होता. आता विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबर पालकांनी पुढे काय करायचं यासाठी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.
आळंदी येथील एका मुलीने ९७ टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे त्या मुलीचं सगळीकडं कौतुक होत आहे. त्या मुलीचे आईवडिल मजूर आहेत. त्याचबरोबर त्यांचं कुटुंब लातूरहून आळंदी येथे स्थलांतरीत झालं आहे. ९७ टक्के गुण मिळविल्याने तिच्या आईवडिलांना सुध्दा चांगलाचं आनंद झाला आहे. त्या विद्यार्थीनीचं पुर्ण नाव सृष्टी पांचाळ असं आहे. सृष्टीनं ५०० पैकी ४८५ गुण मिळविले आहेत. आळंदी येथील श्री. ज्ञानेश्वर महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. तिथल्या शिक्षकांना सुध्दा आनंद झाला आहे. एका मजूराच्या मुलीने आईवडिलांसोबत काम करून इतके मार्क मिळविल्याने सगळीकडे चर्चा सुरु आहे.
विद्यार्थीनीचे आईवडिल लातूर कायम रोजगार मिळत नसल्यामुळे कुटुंबाच्या उपजिविकेसाठी आळंदी येथे काही आले आहेत. त्यांना आळंदी येथे येऊन कित्येक वर्षे झाली आहेत. विद्यार्थीनीला तिच्या आईवडिलांनी जवळच्या ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे सृष्टी पांचाळ या विद्यार्थीनीची आई तिथं एका कंपनीत मजूर काम करीत आहे. तर वडिल भेटेल ते काम करता अशी माहिती मिळाली आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी14 लाख 34 हजार 893 विद्यार्थी पास झाले आहेत. कोकण विभाग (98.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण), नागपूर विभाग (92.5 टक्के उत्तीर्ण), मुंबई विभागाचा निकाल 93.66 टक्के लागला आहे. 10, हजार शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.