पुणेकरांसाठी चांगली बातमी, एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे रखडलेली दस्त नोंदणी सुरू

कोविड -19 मुळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन लागला. या काळात दस्त नोंदणी देखील बंद राहिली.

पुणेकरांसाठी चांगली बातमी, एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे रखडलेली दस्त नोंदणी सुरू
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 3:47 AM

पुणे : पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. कोविड -19 मुळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन लागला. या काळात दस्त नोंदणी (Stamp Duty) देखील बंद राहिली. त्यामुळे निश्चित कालावधीत दस्तांची नोंदणी झाली नाही. मात्र, आता 26 जूनपासून ही दस्त नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती रु.1000/- इतकी निश्चित करण्याबाबतचे शासनाचे निर्देश देण्यात आलेत. पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि. पं. पाटील यांनी एका पसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली (Stamp duty will start in Pune on 26 June 2021 amid long period pending work).

या निर्णयामुळे नोंद न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 27 च्या प्रचलित तरतुदीप्रमाणे डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी तर जानेवारी 2021 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती रु.1000/- इतकी निश्चित करण्यात आलीय.

26 जून 2021 रोजी पुण्यात कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी

या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ मिळावा यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2/ दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये 26 जून 2021 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 / दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरु ठेवण्यात येत आहे.

दस्त नोंदणीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्या

सह दुय्यम निबंधक बारामती, बारामती क्र.2, दुय्यम निबंधक कार्यालय, आंबेगांव, भोर, दौंड, इंदापूर, नारायणगांव, केडगांव, खेड, खेड क्र. 2, खेड क्र. 3, लोणावळा, मावळ, मावळ क्र.2, मुळशी, मुळशी क्र.2, जुन्नर, पुरंदर, शिरुर, तळेगांव ढमढेरे, वेल्हा हे कार्यालय सुरु राहणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि. पं. पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :

मुंबईत मे महिन्यात 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री; मुद्रांक शुल्क रद्द करण्याची उद्योजकांची मागणी

मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत, पण 15 वर्षे घर विकता येणार नाही; काय आहे नियम वाचा!

मुंबई रियल इस्टेट क्षेत्रात इतिहास घडला, 10 दिवसांत 3 हजार 95 घरांची विक्री!

व्हिडीओ पाहा :

Stamp duty will start in Pune on 26 June 2021 amid long period pending work

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.