Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यमंत्री भरणेंवर दु:खाचा डोंगर, वडील विठोबा भरणे काळाच्या पडद्याआड

राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन झालं आहे.

राज्यमंत्री भरणेंवर दु:खाचा डोंगर, वडील विठोबा भरणे काळाच्या पडद्याआड
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 8:07 AM

इंदापूर : राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: भरणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. (State Minister Dattatray Bharne Father Vithoba Bharne pass Away)

विठोबा भरणे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 90 वर्षांचे होते. इंदापूर तालुक्यात तात्या नावाने ते ओळखले जायचे. प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती.

विठोबा भरणे यांच्यावर आज बुधवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच भरणेवाडी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंत्यविधीला उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील आमदार सोलापूर जिल्ह्यातील आमदार, बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

“आपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आमचे वडील तिर्थरूप विठोबा (तात्या) भरणे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. उद्या बुधवार दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मूळगावी भरणेवाडी ता.इंदापूर जि. पुणे येथे अंत्यविधी होणार आहे”, अशी माहिती भरणे यांनी ट्विटद्वारे दिलीय.

राज्यमंत्री भरणेंवर दु:खाचा डोंगर

वडिलांच्या निधनाची वार्ता कळताच राज्यमंत्री भरणेंवर दु:खाचा डोंगर कोसळला. भरणे यांच्या आयुष्यात तात्यांचं स्थान फार महत्त्वाचं होतं. त्यांच्या जडणघडणीत तात्यांचा मोठा वाटा राहिला आहे. आपले तात्या आता आपल्यात नाही, ही कल्पना त्यांना असह्य होत होती.

लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशा भावना यावेळी दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केल्या. (State Minister Dattatray Bharne Father Vithoba Bharne pass Away)

हे ही वाचा

मुलाला सख्खा मामा नाही, पण दत्ता’मामा’ आहेत ना…, राज्यमंत्र्यांच्या कृतीची एकच चर्चा!

पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला शुभेच्छा, इंदापूरचं शेतकरी कुटुंब भारावलं

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.