Pune stray dogs : पुणे शहरात श्वानांची नसबंदी धीम्या गतीनं, निविदा काढणार; अधिकारी म्हणतात…

मागील आर्थिक वर्षात पुणे महापालिकेकडून जवळपास सतरा हजार श्वानांची नसबंदी करण्यात आली होती आणि आता सध्या दोन खासगी कंपन्या यासाठी कार्यरत असल्याचे देखील पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Pune stray dogs : पुणे शहरात श्वानांची नसबंदी धीम्या गतीनं, निविदा काढणार; अधिकारी म्हणतात...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 3:33 PM

पुणे : पुणे महापलिकेतर्फे (Pune municipal corporation) 2012पासून शहरातील भटक्या श्वानांची नसबंदी केली जाते. मात्र सध्या ही नसबंदी अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यावर्षी आठ महिन्यात केवळ 2934 भटक्या श्वानांची नसबंदी झाली आहे. शहरात सध्या श्वानांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. शहरात सद्यस्थितीला तीन लाख भटके श्वान (Pune stray dogs) असण्याची शक्यता एका खासगी संस्थेने आपल्या अहवालात वर्तवली आहे. इतकेच नाही तर शहरातील श्वानांची शेवटची गणनादेखील 2018मध्ये झाली होती आणि आता त्यानंतर यावर्षी देखील पुणे महानगरपालिका निविदा (Tender) काढणार आहे. त्यातच पुणे महानगरपालिकेत मागील काही दिवसात नव्या 34 गावांचा समावेश झाल्यामुळे या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सतरा हजार श्वानांची नसबंदी

मागील आर्थिक वर्षात पुणे महापालिकेकडून जवळपास सतरा हजार श्वानांची नसबंदी करण्यात आली होती आणि आता सध्या दोन खासगी कंपन्या यासाठी कार्यरत असल्याचे देखील पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या किती आहे, याबद्दल निश्चित माहिती नाही. मात्र त्यांची गणना केल्यानंतरच याची आकडेवारी समोर येईल, असे महापालिका अधिकारी सारिका फुंडे यांनी म्हटले आहे.

शहराची जेवढी लोकसंख्या त्याच्या तीनपट कुत्री

एका संस्थेकडून आम्हाला अशी माहिती मिळाली, की शहराची जेवढी लोकसंख्या असेल त्याच्या तीनपट कुत्र्यांची संख्या असते. त्यानुसार शहराची आताची लोकसंख्या त्यात 34 गावांचा झालेला समावेश गृहीत धरून कुत्र्यांची संख्या मोजावी लागणार आहे. युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आपल्याकडे काम करते. सीसीसी संस्थाही कार्यरत आहे. मोफत शस्त्रक्रिया आणि लसीकरणाचे काम ही संस्था करते, असे फुंडे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

जास्तीत जास्त एबीसी प्रोग्राम करण्याचा प्रयत्न

सध्या दोन संस्था कार्यरत आहेत. आणखी दोन संस्थांना आपण काम देणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांना काम देऊन एबीसी प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्या म्हणाल्या. 2021-22मध्ये 17,170पर्यंत नसबंदी आणि लसीकरणाचा आकडा गेला आहे, असे फुंडे यांनी सांगितले.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.