आता माघार नाही ; पुण्यातील एसटी कामगार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम 

जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी मान्य होता नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं कामगारांनी म्हटलं आहे. आमच्यातील एकही कर्मचारी कामावर हजर झाला नसून संप फोडण्यासाठी अफवा पसरवल्या जात असल्याचं मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. स्वारगेट बसस्थानकातून शिवशाही बसेस जागेवरच उभ्या आहेत. तर खासगी बसेसमधून प्रवाश्यांची वाहतूक सुरु आहे.

आता माघार नाही ; पुण्यातील एसटी कामगार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम 
swarget Bus Depo
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 12:40 PM

पुणे – राज्यात 28 ऑक्टोबरपासून सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला नाही. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्यसरकरमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याची ठाम भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. संपाच्या16  दिवशी पुण्यातील आंदोलक आपल्या संपावर ठाम आहेत. शहरातील स्वारगेट व शिवाजीनगर आगारात आंदोलनाला बसलेला एकही एसटी कर्मचारी कामावर परतलेला नाही.

जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी मान्य होता नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं कामगारांनी म्हटलं आहे. आमच्यातील एकही कर्मचारी कामावर हजर झाला नसून संप फोडण्यासाठी अफवा पसरवल्या जात असल्याचं मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. स्वारगेट बसस्थानकातून शिवशाही बसेस जागेवरच उभ्या आहेत. तर खासगी बसेसमधून प्रवाश्यांची वाहतूक सुरु आहे.

कामावर येण्याचे आवाहन माझी एसटी कामगारांना कळकळीची विनंती आहे. आता परिवहन मंत्री अनिल परबांनी केली पगार वाढ तात्पुरती आहे. त्री समितीचा अहवाल ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे जर शासनात विलीनीकरण असेल तर महामंडळाचे विलीनीकरण केले जाईल. विलीनीकरण नसेल तर पुढचा विचार करू असे म्हटले आहे. तोपर्यंत एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा 12 आठवाड्याचा अहवाल येई पर्यंतचा काळ सहन करावा. आपल्या कुठल्या कर्मचाऱ्याचं नुकसान होवू नये. कारण सरकार सरकार असते, कर्मचारी कर्मचारी असतो. आपली बायका पोरं रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी ,माझी सर्व कामगाराना विनंती आहे की त्यांनी कामावर रुजू व्हावे. 12 आठवड्यानंतर आपल्याला अपेक्षित निर्णय नाही झाला तर यापेक्षाहीउग्र स्वरूपाचे आंदोलन करू असे आवाहन स्वारगेट डेपोचे चालक संजय मुंडे यांनी कामगारांना केलं आहे.

प्रवाश्यांना मोठा फटका गेल्या 16 दिवसांपासून एसटीचा संप असल्याने प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्यातील ग्रामणी भागात पर्यायी वाहतूक व्यवस्थेकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरुर आणि खेड या ठिकाणी बसची सुविधा नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Narendra Modi: भ्रष्टाचारात सजा झाली तरी सगळीकडे उदोउदो कसा? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते मोदींच्या टार्गेटवर

E-Shram Yojna : आता शेतमजुरांनाही मिळणार अपघात विम्याचे कवच ; असे मिळवा ई-श्रम कार्ड…!

डॉक्टरची एक लाखाची ऑफर, डोंबिवलीत गणपती मंदिराजवळ आईने पोटचं बाळ सोपवलं, पण…

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.