Pune : शाळेच्या आवारात अचानक बसनं घेतला पेट, हडपसरमधल्या अँजल मिकी शाळेतला प्रकार, सुदैवानं जीवितहानी नाही

प्रयत्न केल्यास, दक्षता बाळगली तर असे अपघात नक्कीच थांबवू शकतो. हे पाहता शाळा प्रशासनाने खबरदारी बाळगावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Pune : शाळेच्या आवारात अचानक बसनं घेतला पेट, हडपसरमधल्या अँजल मिकी शाळेतला प्रकार, सुदैवानं जीवितहानी नाही
अचानक लागलेल्या आगीत स्कूल बस जळून खाकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 9:48 AM

पुणे : हडपसर येथील सोलापूर महामार्गावरील पंधरा नंबर परिसरात शाळेच्या आवारात उभ्या बसने अचानक पेट (Bus fire) घेतला. बसमध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी ही घटना घडली. पंधरा नंबर येथील अँजल मिकी मिनी इंग्रजी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या बसला अचानक भीषण आग लागली. एका स्थानिक नागरिकाने घटनेची माहिती अग्निशामक केंद्राला (Firebrigade) कळविली. काळेपडळ येथील अग्निशामक केंद्राच्या पथकाने प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग नियंत्रणात आणली. बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्कीट (Short circuit) झाल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आला आहे.

प्रकार वाढले

बसला आग लागण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. मागील वर्षी दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली होती. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवले. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर यावर्षीच्या फेब्रुवारीत कोथरुडमध्ये आगीची घटना घडली. चांदनी चौक परिसरातील हायवेवर बसला आग लागली. ही आग विझवताना कोथरूड अग्निशामक केंद्राचे अधिकारी जखमी झाले होते. या आगीचे कारणदेखील स्पष्ट झाले नव्हते.

हे सुद्धा वाचा

ठोस उपाययोजना हवी

अचानक होणाऱ्या अशा घटनांमुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. अशावेळी शाळा प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते, त्यांचे चेकअप वेळच्या वेळी केले जावे. निर्धारित वेळेत या वाहनांची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्यात यावी. कारण एखाद्या वायरच्या स्पार्किंगमुळेही पूर्ण गाडीला आग लागू शकते. या घटनेतही असाच प्रकार घडला आहे. प्रयत्न केल्यास, दक्षता बाळगली तर असे अपघात नक्कीच थांबवू शकतो. हे पाहता शाळा प्रशासनाने खबरदारी बाळगावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.