pune lok sabha News | माधुरी दीक्षित हिला भाजपचे तिकीट? पुणे लोकसभेसाठी कोणाच्या नावावर चर्चा
pune lok sabha News | लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मिशन ४५ ची तयारी सुरु झाली आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात त्यासाठी काही जणांच्या नावाची चर्चा झाली. त्यात धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिचाही समावेश आहे. पुणे लोकसभेसाठी...

पुणे | 26 सप्टेंबर 2023 : लोकसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरु झाली असून महाराष्ट्रात मिशन ४५ ची सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे, मुंबईचे दौरे करत आहे. आता भाजपने धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिला उमेदवारी देण्याची तयारी सुरु केली आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात काही नावांवर चर्चा झाली. त्यात माधुरी दीक्षित हिचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
माधुरी दीक्षित हिला कोठून मिळणार उमेदवारी
भाजपने मिशन ४५ साठी चांगल्या उमेदवारांचा शोध सुरु केला आहे. चित्रपटसृष्टी गाजवणारी धक, धक गर्ल भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजप माधुरी दीक्षित हिला मुंबईतून उमेदवारी देणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात दोन दिवासांपूर्वी अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यावेळी जळगाव, धुळे, पुणे लोकसभेचासाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली.
पुणे लोकसभेसाठी कोण असणार उमेदवार
पुणे लोकसभेसाठी इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी आहे. पुणे लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे या नावांची चर्चा आहे. परंतु भाजपकडून सुनिल देवधर यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. सुनील देवधर हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव आहेत. ते संघाचे प्रचारक होते.




जळगाव, धुळ्यात कोण असणार उमेदवार
पुणे लोकसभेप्रमाणे जळगाव, धुळे लोकसभसेसाठी चर्चा झाली आहे. जळगावमधून प्रसिद्ध वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम निकम यांच्या नावावर चर्चा झाली तर धुळ्यातून प्रतापराव दिघवकर यांच्या नावावर चर्चा झाली. जळगावातून भाजपचे उन्मेष पाटील तर रावरेमधून रक्षा खडसे खासदार आहे. जळगाव मतदार संघातून उन्मेष पाटील यांच्याऐवजी उज्ज्वल निकाम यांना संधी दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.