AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Shelke : तुमचं डिपॉझिटही जनता जप्त करते, लायकी असेल तर मावळात उभं राहा; सुनील शेळकेंचं गोपीचंद पडळकरांना आव्हान

महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्याचे आणि देशातील महागाई, बेरोजगारी ह्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाची रणनीती आहे, असा आरोप सुनील शेळके यांनी केला.

Sunil Shelke : तुमचं डिपॉझिटही जनता जप्त करते, लायकी असेल तर मावळात उभं राहा; सुनील शेळकेंचं गोपीचंद पडळकरांना आव्हान
सुनील शेळके/गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 4:29 PM

मावळ, पुणे : भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) जी वक्तव्ये करीत आहेत, ती जाणीवपूर्वक करत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलेही वक्तव्य केले तरी जनता ते स्वीकारत होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी जे वक्तव्य केले होते ते लायकी नसलेल्या पडळकरांनी करणे शोभत नाही, अशी घणाघाती टीका मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केली आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये शरद पवार यांचे योगदान देशाला माहीत आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी आपली लायकी पाहून वक्तव्ये करायला हवीत, असे सुनील शेळके म्हणाले आहेत. गोपचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) गुरू मानले आहे. तेव्हा फडणवीसांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्या पिलावळांना समजून सांगितले पाहिजे, असे शेळके म्हणाले.

‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

आपल्याला विधानपरिषद दिली म्हणून उगाच कुणावर तोंड टाकायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या ग्रामपंचायतीमध्येसुद्धा आपल्याला किंमत नाही. विधानसभेत काय दिवे लावता, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तुमचे डिपॉझिटही जनता जप्त करते. जर तुमची लायकीच असेल तर एकदा मावळात येवून उभे राहा, मग तुम्हाला तुमची लायकी कळेल, असा घणाघात शेळके यांनी पडळकर यांच्यावर केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘लक्ष विचलित करण्याचे काम’

बेतालपणे बोलणाऱ्या पडळकरांना महत्त्व देऊ नये. त्यांच्या मागे असलेले ज्यांची तडफड सुरू आहे, अशा फडणवीसांना सांगा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. राजकीय दर्जा खालावत चालण्यामागचा सूत्रधार कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ही आपली संस्कृती आणि राजकारण नव्हते. महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्याचे आणि देशातील महागाई, बेरोजगारी ह्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाची रणनीती आहे, असा आरोप त्यांनी केला.

गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य काय?

गोपीचंद पडळकर यांनी कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली होती. नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या ###वर लाथ घाला, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील. त्यानंतर त्यांना कांद्याचा वास द्या, ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का, असा सवाल करून पडळकर यांनी वाद ओढवून घेतला आहे.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.