AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इंदापुरच्या तरुणाचा मृत्यू, मृतदेह आणण्यात अडथळे, अखेर सुप्रिया सुळे धावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने रशियात मृत्यू झालेल्या भारतीय तरुणाचा मृतदेह इंदापूरमध्ये आणणे शक्य झाले आहे.

रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इंदापुरच्या तरुणाचा मृत्यू, मृतदेह आणण्यात अडथळे, अखेर सुप्रिया सुळे धावल्या
| Updated on: May 02, 2021 | 4:39 AM
Share

पुणे : रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय तरुणाचा तिकडेच अकाली मृत्यू झाला. मात्र निधन झालेल्या इंदापूर तालुक्यातील या विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह इंदापूरमध्ये आणणे शक्य झाले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या तरुणाचा 21 एप्रिल रोजी कर्करोगामुळे निधन झालं होतं (Supriya Sule help Bodake family to take dead body from Russia to Indapur).

तन्मय आबासाहेब बोडके (वय 22, रा. पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो रशियामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला होता. रशियामधील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात तो शिकत होता. अचानक वजन वाढत जाऊन त्याला चालणेही मुश्किल झाले. त्यामुळे रुग्णालयात तपासणी केली असता त्याला कर्करोग झाल्याचे लक्षात आले. त्यासाठी शस्त्रक्रिया चालू असताना रक्तदाब कमी होऊन त्याचे निधन झाले, अशी माहिती मृत तन्मयचे निकटवर्तीय श्रीकांत बोडके यांनी दिली.

रशियाच्या राजदुतांपासून निझनी विद्यापीठांपर्यंत सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा

भारतात सध्या कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत परदेशात निधन झालेल्या तन्मयचे पार्थिव विमानाने भारतात आणून त्याच्या मूळ गावापर्यंत पोहोचवणे मोठे जिकिरीचे होते. ही बाब श्रीकांत बोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार सुळे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर, रशियाचा भारतातील दूतावास, तेथील निझनी विद्यापीठ प्रशासन यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत तन्मय याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यासह यंत्रणेचे सुप्रिया सुळेंकडून आभार व्यक्त

या प्रयत्नांना अपेक्षित यश येऊन अखेर 29 एप्रिल रोजी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचा मृतदेह आणण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत सुप्रिया सुळे या सातत्याने बोडके कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. त्यांना सतत आधार देत इकडे दोन्ही देशांच्या प्रशासनाशीही त्या पाठपुरावा करत होत्या. अखेर मृतदेह मुंबईत दाखल झाल्यानंतर सुळे यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर, रशियन दूतावास आणि अन्य शासकीय यंत्रणांचे आभार मानले.

बोडके कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त

तन्मयचे पार्थिव मुंबईहून रुग्णवाहिकेतून इंदापूर तालुक्यात पिंपरी बुद्रुक या त्याच्या मूळ गावी आणल्यानंतर शुक्रवारी (30 एप्रिल) सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत अडचणीच्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या मदतीमुळे तन्मयचे पार्थिव आणता आले, अशी भावना बोडके कुटुंबाने व्यक्त केलीय. तसेच त्यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार मानलेत.

हेही वाचा :

शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण, पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा गाजवली

Sharad Pawar: सुप्रिया सुळेंनी शरद पवारांवरील दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर पोस्ट केला फॅमिली फोटो, म्हणाल्या…

महाविकासआघाडीच्या गोटात वेगवान हालचाली; सुप्रिया सुळेंची सोनियांशी चर्चा, मुंबईतही नेत्यांची गुप्त खलबतं

व्हिडीओ पाहा :

Supriya Sule help Bodake family to take dead body from Russia to Indapur

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.