कॉपी करुन पास झालेल्यांनी पुण्याचं वाटोळं केलं, सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढती महागाई आणि पुणे महानगरपालिकेतील कारभार यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही लोकांच्यासाठी असतो. लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत जातो. पुणे जिल्ह्याच्या योगदानामुळं महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढा जिंकेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढती महागाई आणि पुणे महानगरपालिकेतील कारभार यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही लोकांच्यासाठी असतो. लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत जातो. पुणे जिल्ह्याच्या योगदानामुळं महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढा जिंकेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडी सरकार तुमच्या आयुषयात बदल घडवण्यासाठी आहे. आर्यन खानला जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत ते बघा. त्या दरवाढीकडे लक्ष जाऊ म्हणून आर्यन खानच्या बातम्या सुरू होत्या. गॅस दरवाढीमुळं मी दिवाळीमध्ये भाऊबीज म्हणून अजित पवार यांच्यासह इतर भावांकडे गॅस सिलेंडर मागणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. महागाईनं सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडलंय संसदेत मी गॅसचे दर कमी करावेत. यासंदर्भात मागणी करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. कॉपी करुन पास झालेल्या लोकांनी पुण्याचं वाटोळं केलं, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय.
महाविकास आघाडी सरकार तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी
पीडिसीसी बँक शेतकऱ्यांची आहे. किरीट सोमय्या हे पीडिसीसी मध्ये आले होते, भष्ट्राचार आहे असं म्हणाले, पण आम्ही अतिथी देवो भव असच केलं. महाविकास आघाडी सरकार तुमच्या आयुषयात बदल घडवण्यासाठी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुणे महापालिकेतील भाजपने 58 कोटी रुपये सिग्नल रिपीयर करण्यासाठी खर्च केलेत.कॉपी करून पास झालेल्या लोकांनी पुणेकरांचे वाटोळं केलं, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.
पेट्रोल डिझेलचे दर किती वाढले?
आर्यन खानला जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत ते बघा. एका चॅनेलनं आर्यन खान किती दिवस तुरुंगात होता हे सांगितलं. त्या दरवाढीकडे लक्ष जाऊ म्हणून आर्यन खानच्या बातम्या सुरू होत्या.
दिल्लीत सरकार आल्यावर गॅसचे दर कमी करणार
महाविकास आघाडी सरकार हे आमचं सत्याच आणि संघर्षाचे सरकार आहे. अजून दिल्लीत आपलं सरकार यायचं आहे. दिल्लीत आपलं सरकार आल्यावर पहिल्यांदा गॅसचे दर कमी करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हर्षवर्धन पाटील आणि सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी आम्ही भाजपमध्ये आल्यानं ईडीच्या नोटीस येणार नाहीत, असं म्हटलं. नरेंद्र मोदीजी तुम्ही चांगले नेते आहेत पण दिवाळीनिमित्त भाऊबीज भेट म्हणून सिलेंडरचे दर कमी करा, अशी विनंती करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अनिल देशमुख यांना ईडीची नोटीस आली होती, म्हणून ते ईडीच्या कार्यालयात गेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आमच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप केले जातायत, जे एखाद्या संस्थेचे बोलायला पाहिजे ते प्रवक्ते बोलतायत, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांना सोमय्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी काय आरोप केलेत, ते मी ऐकलं नाहीय, त्यांची आजची प्रेस पहिली नाही. आमचं दडपशाहीचं सरकार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
इतर बातम्या:
अनिल देशमुख ईडीसमोर हजर का झाले? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितली तीन कारणं
नवाब मलिकांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ, मुंबई रिव्हर अँथममधून जयदीप राणाचं नाव गायब?
Supriya Sule slam BJP for situation of Pune and Narendra Modi Government over hike of Fuel Rates