वरंधा घाटात दोनशे फूट दरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; घातपात की आत्महत्या पोलिसांचा तपास सुरु
पोलिसांनी सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह वरती काढला.त्यानंतर पोस्टमार्टम साठी मृतदेह भोरच्या सरकारी रुग्णालयात आलाय. घातपात की आत्महत्या ह्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे – भोरमार्गे महाडला जाणाऱ्या पुणे- महाड मार्गावरील वरंधा घाटात दोनशे फूट दरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिटी मिळताच भोर पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने दरीत उतरून शोध कार्य घेण्यात आले. त्यानंतर मृतदेह वर काढण्यात आला. मात्र एवढ्या खोल दरीत मृतदेह आला कसा याचा शोध सध्या भोर पोलीस घेतायत. दरीत आढळून आलेल्या मृत व्यक्तीचे वय सुमारे 30 ते 35 वर्ष असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या परिश्रमानंतर पोलिसांनी सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह वरती काढला.त्यानंतर पोस्टमार्टम साठी मृतदेह भोरच्या सरकारी रुग्णालयात आलाय. घातपात की आत्महत्या ह्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.