Ashram School : आंबेगावमधील आदिवासी आश्रमशाळेतील 41 विद्यार्थिनींची प्रकृती खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

सर्व विद्यार्थीनी आजारी असून, त्यांना पायाला मुग्या येणे चक्कर आणि सर्दी खोकला ही लक्षणे आहेत. सर्व मुलींना मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ashram School : आंबेगावमधील आदिवासी आश्रमशाळेतील 41 विद्यार्थिनींची प्रकृती खालावली, रुग्णालयात उपचार सुरु
आंबेगावमधील आदिवासी आश्रमशाळेतील 41 विद्यार्थिनींची प्रकृती खालावलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 11:15 PM

पुणे : आंबेगाव तालुक्यातील गोहे येथील आदिवासी आश्रमशाळे (Ashram School)तल्या 41 विद्यार्थिनींची प्रकृती (Health) अचानक खालावली आहे. सर्व विद्यार्थीनी आजारी असून, त्यांना पायाला मुग्या येणे चक्कर आणि सर्दी खोकला ही लक्षणे आहेत. सर्व मुलींना उपचारा (Treatment)साठी मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर काही मुलींना बरे वाटले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. वातावरणातील बदलामुळे मुलींना हा त्रास झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही मुलींची तब्येत अद्याप अस्वस्थ असून, डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत.

मुलींना चक्कर, खोकला, सर्दी, ताप ही लक्षणे

आंबेगाव तालुक्यातील गोहे येथील आदिवासी आश्रमशाळेतल्या 41 विद्यार्थीनी अचानक त्रास होत असल्याने सर्व मुलींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शाळेत 450 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. दुपारच्या सुमारास अचानक दोन मुलींना चक्कर आल्याने त्यांना डिंभे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर अजून 39 मुलींना चक्कर, खोकला, सर्दी, ताप ही लक्षणे दिसून आली आणि त्यांना त्रास व्हायला लागला. यानंतर त्यांनाही घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अजून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये 9 मुलींवर उपचार सुरू असून, मंचर उपजिल्हा रुग्णालयात 2 मुलींवर उपचार सुरु आहेत. वातावरणातील बदलांमुळे या मुलींना त्रास होत असल्याचे घोडेगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे. ज्या मुलींना उपचारानंतर बरे वाटले आहे, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ज्या मुलींना अस्वस्थ वाटत आहे, त्यांच्यावर पुढील उपचार करून घरी सोडण्यात येणार आहे. (The condition of 41 female students of tribal ashram school in Ambegaon suddenly deteriorated)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.