AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime| विकृतीचा कळस सासरच्यांच्या मारहाणीत नवविवाहितेचा गर्भपात ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

या काळात सदर महिला गर्भवती असल्याने माहिती असूनही जानेवारी 2021 मध्ये सासरच्या मंडळींनी पोटात व पाठीमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सदर महिलेने सोनोग्राफी केली असता सदर गर्भाचे हृदयाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी महिलेचा गर्भपात झाला.

Pune crime| विकृतीचा कळस सासरच्यांच्या मारहाणीत नवविवाहितेचा गर्भपात ; जाणून घ्या नेमकं काय  घडलं?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 3:56 PM

 प्राजक्ता ढेकळे , पुणे- महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अश्यातच दौंडमधील केडगावमध्ये सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा ( Newlyweds)छळ करत तिला जबर केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात(Abortion) झाला आहे. याबाबत यवत पोलीस (Police )स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. निलेश मोहन सलगर, सासरे तुकाराम मोहन सलगर, सासु सुनंदा मोहन सलगर, नणंद अश्विनी तानाजी मरगळे (पिंपरी चिंचवड) त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. सासरच्या मंडळीनी पैकी पती व सासरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरून यवत पोलीस स्टेशन मध्ये सासरच्या मंडळींवर गर्भपात करणे, फसवणूक, मारहाण ,शिवीगाळ आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं

पीडित विवाहितेची 14  नोव्हेंबर2019  रोजी लग्न झाले असून लग्नानंतर सासरच्या मंडळींनी बोरीपार्धी येथील तिच्या माहेरच्या मंडळीकडे सोन्याची मागणी केली. सोने न दिल्यामुळे मारहाण केली. या काळात सदर महिला गर्भवती असल्याने माहिती असूनही जानेवारी 2021 मध्ये सासरच्या मंडळींनी पोटात व पाठीमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सदर महिलेने सोनोग्राफी केली असता सदर गर्भाचे हृदयाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर पतीने सदर महिलेला बोरिपारधी येथे माहेरी आणुन सोडले.

नोकरीमध्ये असल्याची फसवणूक ऑक्टोबर 2021  मध्ये महिला माहेरी असताना पतीने पुन्हा शिवीगाळ केली. सदर महिलेच्या लग्नामध्ये घातलेले दहा तोळे सोने सासरच्या मंडळींनी ताब्यात घेतले. लग्नाच्या वेळी पतीने सरकारी नोकरीमध्ये नसतानाही सरकारी नोकरीमध्ये असल्याचे सांगुन नवविवाहितेच्या माहेरच यांची फसवणूक केली.

“शाब्बास.. दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात” महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वजाचा सर्वोच्च सन्मान

हिवाळ्यात गाजराचं लोणचं कधी ट्राय केलं आहे का? करून घ्या हे चटकमटक आणि लज्जतदार लोणचं

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज