Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Terrible accident | पुण्यातील जुन्नर रोडवर भरधाव स्कार्पिओवरील चालकाचा ताबा सुटला अन जे झालं ते ….

नारायणगाव जुन्नर रोडवर औटी मळा येथे स्काॅर्पिओ गाडी येत असताना हा अपघात घडला. या वाहनातील नागरिकांनी मद्यप्राशन केलेले असल्यामुळं त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं भीषण अपघाताची घटना घडली. अपघातादरम्यान सुदैवाने एअर बॅग उघडल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.मात्र दोघेजण गंभीरजखमी झाले.

Terrible accident | पुण्यातील जुन्नर रोडवर भरधाव स्कार्पिओवरील चालकाचा ताबा सुटला अन जे झालं ते ....
JUNNER ACCIDENT
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 7:01 PM

जयवंत शिरतर, पुणे – मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे नारायणगाव जुन्नर रोडवर (Narayangaon Junnar Road)औटी मळा येथे स्काॅर्पिओ गाडीचा भीषण अपघात (terrible accident)झाल्याची घटना घडली आहे. नाशिकहून ओझरकडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने स्कार्पिओ (Scorpio)गाडी भरघाव वेगाने बाभळीच्या झाडाला धडकली आहे. यामध्ये प्रवास करणाऱ्यांनी मद्यप्राशान केल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून आणखी तीन जणांची स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात एवढा भीषण होता की  धडकेत दोन बाभळी मुळासकट जमीन दोस्त झाल्या आहेत.

असा झाला अपघात

नारायणगाव जुन्नर रोडवर औटी मळा येथे स्काॅर्पिओ गाडी येत असताना हा अपघात घडला. या वाहनातील नागरिकांनी मद्यप्राशन केलेले असल्यामुळं त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं भीषण अपघाताची घटना घडली. अपघातादरम्यान सुदैवाने एअर बॅग उघडल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.मात्र दोघेजण गंभीरजखमी झाले. या घटनेत स्कार्पिओ झाडावर आदळल्याने दोन झाडे मुळासकट उपटून पडली, विद्युत खांबही तुटले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महावितरणचे अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी , क्रेनच्या सहाय्याने गाडीला बाजुला करुन वाहतुक सुरळित करण्याचे काम सुरु आहे. या भीषण अपघाताच्या निमित्ताने सदर ठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण व स्थानिक जमिन बाधितांना मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात येत आली आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू

मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा (Police) यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले आहे.

Budget 2022: आरोग्य विम्यावर जीएसटीचा भार, करदात्यांना अर्थसंकल्पात करकपातीची अपेक्षा

पनवेल : बस सेवा बंदचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून भाड्याची दुपटीने वसुली

हैवानतेचा कळस! नराधम बापासह भावाचाही बलात्कार! आईची डोळेझाक, कल्याणमधील हादरवणारी घटना

नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.