AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident : कंटेनरला पीकअपनं दिली धडक; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरच्या अपघातात 1 ठार

कंटेनरला पीकअप गाडीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune express way) ओझर्डे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात एक ठार (Dead) तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

Accident : कंटेनरला पीकअपनं दिली धडक; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरच्या अपघातात 1 ठार
ओझर्डे गावच्या हद्दीत झालेला अपघातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 10:35 AM

मावळ, पुणे : कंटेनरला पीकअप गाडीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune express way) ओझर्डे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात एक ठार (Dead) तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. पुण्यावरून मुंबईला कोंबड्यांची वाहतूक करणारा पीकअप टेम्पोच्या चालकाने भरगाव जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे काही काळ या पुणे-मुंबई मार्गिकेवरची वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना ट्रॉमा केअर सेंटरला दाखल करण्यात आले आहे, तर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत. अपघातानंतरचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. यात अपघाताची भीषणता दिसून येते. कोंबड्यांची वाहतूक करणारा पीकअप टेम्पोच्या चालकाने भरगाव जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरात धडक दिल्याने आतील व्यक्तींना गंभीर जखमा झाल्या आहेत.

अपघातानंतर काही काळ कोंडी

या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. स्थानिकांच्या मदतीने दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मागील काही दिवसांत अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही त्यासोबत वाढली आहे. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

PMP Bus Day Pune : पुणेकरांच्या आवडत्या PMPचा आज बस डे, महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची संधी

Pune NCP : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कसली कंबर; अॅपही केलं लॉन्च!

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे जेव्हा फोटोग्राफर बनतात आणि निघते रथातून मिरवणूक!

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.