येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयकास मंजुरी मिळेल- रुपाली चाकणकर
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलं आणि पक्षाचं चांगलं काम केलं की त्याच फळ मिळतं. महिला आयोगाची जबाबदारी देऊन पक्षानं माझ्या संघटनेचा सन्मान केलाय- रुपाली चाकणकर,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
रुपाली चाकणकर
Follow us on
पुणे- महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राने महिलांविषयक कायम सकारात्मक धोरणे राबवली, ज्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक निश्चितपणे मंजुरी मिळेल, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला आहे.
राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार व पवार कुटुंबियांची बारामतीमध्ये भेट घेतली. त्यावेळी त्याबोलत होत्या.
”राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलं आणि पक्षाचं चांगलं काम केलं की त्याच फळ मिळतं. महिला आयोगाची जबाबदारी देऊन पक्षानं माझ्या संघटनेचा सन्मान केलाय”, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शक्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी चाकणकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहले आहे.
शक्ती कायद्यात ‘या’ तरतुदींचा समावेश असणार
या कायद्यानुसार 21 दिवसात खटल्याचा निकाल लागणार
बलात्काराच्या प्रकणातील आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार
अती दुर्लभ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड
ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद