Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : भर वस्तीतून तरुणीच्या हातातला मोबाइल हिसकावला; दुचाकीवरून चोरटे पसार, पाहा CCTV

राजगुरूनगरच्या (Rajgurunagar) भर बाजारपेठ रस्त्यावर तरुणीच्या हातातील मोबाइल (Mobile) हिसकावून चोरट्यांनी (Thieves) पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Pune crime : भर वस्तीतून तरुणीच्या हातातला मोबाइल हिसकावला; दुचाकीवरून चोरटे पसार, पाहा CCTV
तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून नेताना चोर सीसीटीव्हीत कैदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 11:16 AM

पुणे : राजगुरूनगरच्या (Rajgurunagar) भर बाजारपेठ रस्त्यावर तरुणीच्या हातातील मोबाइल (Mobile) हिसकावून चोरट्यांनी (Thieves) पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजगुरूनगर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाडा रोड येथे रस्त्याच्या बाजूला तरुणी मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र दुचाकीवरील चोरटे पुणे नाशिक महामार्गावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे चोरटे आता भर लोकवस्तीतही चोरी करू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा वचक चोरट्यांवर राहिला नाही का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रकार वाढले

अलिकडील काळात मोबाइल हिसकावण्याचे, सोनसाखळी चोरांचे हे प्रकार वाढले असून अशा चोरांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणीदेखील त्यांना कोणतीही भीती वाटत नसल्याचे दिसत आहे. अशावेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

आणखी वाचा :

Nagpur Crime | रामटेकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलीच्या आईने आरोपीस चपलेने बदडले

Kundmala Induri : सेल्फीच्या नादात विद्यार्थी पाण्यात बुडाला, अद्याप मुलाचा मृतदेह सापडला नाही

Nagpur Crime | नागपुरात सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला, डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन किलो सोने लुटले

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.