Monsoon Alert : यंदा मोसमी पाऊस तळकोकणात लवकरच दाखल ; 17 ते 19  मे या कालावधीत पुण्यासह 13 जिल्ह्यांना यलो अर्लट

हवामान विभागाच्या मते महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19  मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Monsoon Alert : यंदा मोसमी पाऊस तळकोकणात लवकरच दाखल ; 17 ते 19  मे या कालावधीत पुण्यासह 13 जिल्ह्यांना यलो अर्लट
Mansoon newsImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 8:30 AM

पुणे- यंदा तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. यावेळी मान्सून अंदमानाच्या समुद्रात मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारीच दाखल झाला आहे. येत्या 2  जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. सर्वसाधारणपणे यावेळी मोसमी पाऊस (Rain)पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. याचाच र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता ते तळकोकणात 8ते 10 जूनऐवजी 2  ते3 जूनला येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमान तीन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 24  तासात मराठवाड्यासह (Marathwada)विदर्भात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

पुण्यासह 13  जिल्ह्याना यलो अलर्ट

हवामान विभागाच्या मते महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19  मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 13  जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.