MPSC चा पुन्हा गोंधळ, विद्यार्थी संकटात, एकाच दिवशी तीन परीक्षा

MPSC Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा गोंधळ निर्माण केला आहे. आयोगाने एकाच दिवशी तीन परीक्षांचे आयोजन केले आहे. यामुळे एमपीएससी परीक्षेचा रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या दोन संधी वाया जाणार आहेत. एसपीएससीच्या तीन परीक्षा १७ डिसेंबरला एकाच दिवशी होत आहे.

MPSC चा पुन्हा गोंधळ, विद्यार्थी संकटात, एकाच दिवशी तीन परीक्षा
mpscImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 7:31 AM

प्रदीप कापसे, पुणे दि. 25 नोव्हेंबर 2023 | सरकारी नोकरी हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्ष रात्रंदिवस एक करतो. अनेक जण कुठे छोटी-मोठी नोकरी करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेसाठी तयारी करतात. जागा कमी आणि लाखो अर्ज अशी परिस्थिती असते. यामुळे एमपीएससीकडून घेण्यात येणारी प्रत्येक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. परंतु एमपीएससी बोर्ड विद्यार्थ्यांची परीक्षा पाहत असल्याचे दिसून येत आहे. एमपीएससी बोर्डाने पुन्हा गोंधळ तयार निर्माण केला आहे. एकाच दिवशी तीन परीक्षा होणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या दोन संधी वाया जाणार आहेत. एसपीएससीच्या तीन परीक्षा १७ डिसेंबरला एकाच दिवशी होत आहे.

कोणत्या परीक्षा एकाच दिवशी

एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या गट क क्लार्क, टॅक्स सहायक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. या तिन्ही परीक्षा १७ डिसेंबरला एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्याची मागणी केली आहे. मंडळ वेळापत्रक तयार करताना एकाच दिवशी तीन परीक्षांचे आयोजन कसे करते? मंडळाकडून विद्यार्थ्यांचा काहीच विचार होत नाही का? असे प्रश्न विद्यार्थी विचारत आहे.

विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा

राज्य लोकसेवा आयोगामार्फत उत्तीर्ण झालेल्या कृषी विभागातील २०३ उमेदवारांची मागील सहा महिन्यांपासून नियुक्ती करण्यात आली नाही. परीक्षा उत्तीर्ण झालेले हे कृषी पदवीधर सध्या बेरोजगारीचा सामना करत आहे. एकीकडे राज्य सरकार ७५ हजार जागा भरण्याची घोषणा करते तर दुसरीकडे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी देत नाही. यामुळे सरकारविरूद्ध आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, अशी व्यथा एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी मांडू लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रचंड मेहनतीनंतर विद्यार्थी उत्तीर्ण

शेतकरी कुटुंबातील मुलांनी प्रचंड संघर्ष करून राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यातून २०३ उमेदवार परीक्षेच्या अंती निवडीस पात्र ठरले आहेत. यातील उमेदवारांची नियुक्ती ही कृषी उपसंचालक तसेच मंडळ व तालुका कृषी अधिकारी पदावर करण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल लागून सहा महिने झाले. त्यानंतर नियुक्ती पत्र नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.