सध्या पावसाळी पर्यटन विसरा, पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद, महाबळेश्वरलाही…

tourist places in pune: पुणे शहरात गेल्या ३२ वर्षांमधील सर्वाधिक पाऊस झाला आहे. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी तब्बल ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण, सिंहगड, लोणावळा-खंडाळा, मावळ असे अनेक ठिकाणी पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जातात.

सध्या पावसाळी पर्यटन विसरा, पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद, महाबळेश्वरलाही...
लोणावळामधील पर्यटन स्थळ
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 10:17 AM

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावासाचा रेड अलर्ट गुरुवारी दिला आहे. तसेच येत्या आठवड्यात पाऊस सुरु राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सर्व पर्यटन स्थळावर बंदी आणण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद राहणार आहे. यामुळे तुमचा मान्सूनचा पर्यटन करण्याचा बेत असल्यास तो रद्द करावा लागणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरात गेल्या ३२ वर्षांमधील सर्वाधिक पाऊस झाला आहे. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी तब्बल ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण, सिंहगड, लोणावळा-खंडाळा, मावळ असे अनेक ठिकाणी पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जातात.

लोणावळ्यात सर्व धबधबे प्रवाहीत, पण बंदी

लोणावळ्यातील सहारा पूल, भुशी धरण, लाईन्स पॉईंट या परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः कहर पाहिला मिळत आहे. या भागांत असणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वाहत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी व धोका निर्माण होऊ नये याकरिता सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मावळ प्रांताधिकारी यांनी 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

हे सुद्धा वाचा

सातारा जिल्ह्यात 12 पॉईंटवर पर्यटकांना जाण्यास बंदी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणचे प्रसिद्ध ऑर्थर सीट पॉईंट परिसरातील इतर 12 पॉईंटवर पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे. याबरोबरच मुसळधार पावसामुळे या भागात प्रसिद्ध असणाऱ्या लिंगमळा धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे पर्यटकांसाठी बंद केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या उपायोजना केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहे.

लिंगमळा धबधब्यावर बंदी

महाबळेश्वरचा प्रसिद्ध असा लिंगमळा धबधबा वेण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. तसेच धोकादायक ठिकाणी काटेरी तार व काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने देखील ऑर्थोसीट पॉईंट परिसरातील इतर 12 पॉईंटवर पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे. मुसळधार पावसामुळे या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे डोंगर कपारीतून पडणारा हा धबधबा डोळ्याचे पारणे फेडत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.