Pune news : राजगड किल्ल्यावर फिरायला आला होता, अचानक गायब झाला, मित्रांनी शोधाशोध केली, पण काही वेळाने जे समोर आलं ते…

चार मित्र गडावर फिरायला गेले होते. रात्री गडावरच त्यांचा मुक्काम होता. मात्र दुसऱ्या दिवशीची सकाळ त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. पिकनिकला येणं तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.

Pune news : राजगड किल्ल्यावर फिरायला आला होता, अचानक गायब झाला, मित्रांनी शोधाशोध केली, पण काही वेळाने जे समोर आलं ते...
राजगडावर पाण्याच्या टाकीत पर्यटक बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 5:22 PM

पुणे / 15 ऑगस्ट 2023 : पुण्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा गडावरील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अजय मोहनन कल्लामपारा असे मयत तरुणाचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू झाला. टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन अजय पाण्यात पडला. अजय भिवंडी येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यात ससून रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार योगेश जाधव पुढील तपास करत आहेत.

चौघे मित्र राजगडावर फिरायला गेले होते

भिवंडी येथील चार तरुण पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड येथे फिरायला आले होते. चौघेही रात्री पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिराजवळ एका तंबू ठोकून मुक्कामाला होते. पहाटे अजयला जाग आली आणि तो पाण्याची बाटली घेऊन पद्मावती तळ्याजवळ पाणी आणायला गेला. मात्र पाणी काढताना तो तोल जाऊन पाण्यात पडला. सकाळी मित्रांना जाग आली तेव्हा अजय तंबूत नव्हता.

सकाळी मित्रांना मृतदेह तरंगताना दिसला

मित्रांनी गडावर खूप शोधाशोध केली. मात्र तो कुठेही सापडला नाही. यानंतर तलावाजवळ पाण्याची बाटली आणि चप्पल दिसली. मित्रांनी तलावाजवळ जाऊन पाहिले तर अजयचा मृतदेह पाण्यात तरंगत होता. मृतदेह पाहून मित्र घाबरले. याचदरम्यान आज स्वातंत्रदिन असल्याने सकाळी गडावर ध्वजारोहणासाठी वेल्हा पोलीस ठाण्याचे जवान युवराज सोमवंशी, स्थानिक पाहरेकरी बापू साबळे, आकाश कचरे, योगेश दरडिगे, विशाल पिलवारे यांना ही बाब कळली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढत गडावरुन खाली आणण्यात आला.

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.