AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sinhagad road traffic : वाहतूककोंडीनं ग्रस्त सिंहगड रस्ता; स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संथगतीच्या कामाचा रहिवाशांना ताप!

संतोष हॉल, माणिकबाग ते हिंगणे दरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे कोंडी होत आहे. पीएमसीने सिंहगड रोडवर विकास कामे केली आहेत, परंतू वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणतीही योजना नाही, अशी रहिवाशांची तक्रार आहे.

Sinhagad road traffic : वाहतूककोंडीनं ग्रस्त सिंहगड रस्ता; स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संथगतीच्या कामाचा रहिवाशांना ताप!
विकासकामांमुळे होत असलेली कोंडी (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: punemirror
| Updated on: Jun 19, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : सिंहगड रोड सध्या वाहतूककोंडीने व्यस्त झाला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत (Smart city project) पु. ल. देशपांडे उद्यानाभोवती उड्डाणपुलाच्या बांधकामाची संथ गती आणि फुटपाथची रुंदी वाढल्याने दांडेकर पूल ते वडगाव बुद्रुक दरम्यानच्या सहा किमीच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic jam) होत आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे म्हणाले, की सिंहगड रोडवर वाहनांच्या वाहतुकीसाठी फक्त दोन लेन उपलब्ध आहेत, कारण उड्डाणपुलाच्या बांधकामाने मधली लेन व्यापली आहे. राजाराम पूल आणि सिंहगड रोडला (Sinhagad road) जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. आम्ही नागरी संस्थेला बागेजवळील दुसर्‍या मार्गाचे बांधकाम जलद करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून वाहने नवले कॉलेज चौकातून वळवता येतील, असेही ते पुढे म्हणाले.

महापालिकेला पत्र

भूमिगत ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी रस्ता खोदणे, चुकीच्या बाजूने आणि बेधडक वाहने चालवणे आणि सिंहगड रोडवरील निकामी सिग्नल यामुळेही वाहतूक कोंडी होते. आम्ही पीएमसीला बॅरिकेड्स बसवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी वॉर्डन नियुक्त करण्यासाठी पत्र लिहिले आहे. मर्यादित मनुष्यबळासह, आम्ही वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

‘वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणतीही योजना नाही’

सिंहगड रोडच्या रहिवाशांच्या मते, महापालिकेने बाग ते नवश्या मारुती चौक दरम्यानचा रस्ता पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदला आहे, मात्र त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. बहुतेक वेळा सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. संतोष हॉल, माणिकबाग ते हिंगणे दरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे कोंडी होत आहे. पीएमसीने सिंहगड रोडवर विकास कामे केली आहेत, परंतू वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणतीही योजना नाही. भंडारी हॉटेल आणि नवश्या मारुती चौकाजवळ फेरीवाल्यांनी निर्माण केलेल्या उपद्रवामुळे वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे.

’20 ते 30 मिनिटे उशीर’

धायरीच्या रहिवाशांच्या मते, तो खराडीहून दररोज उशिरा घरी परततो. पु. ल. देशपांडे बागेत येणारे पर्यटक रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहने चालवतात आणि अनेक फुगे विक्रेत्यांच्या गाड्यांनी या रूंद रस्त्याचा ताबा घेतला आहे. या ठिकाणी, दररोज सुमारे 15 मिनिटे वाया जातात. उड्डाणपुलाच्या कामामुळे सुमारे 20 ते 30 मिनिटे वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे घरी पोहोचण्यासाठी सुमारे 45 मिनिटे वाया जातात, अशा तक्रारी येथील रहिवासी करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.