पुणेकरांचा पोलिसांना गुंगारा, 80 कोटी कधी भरणार?
पुण्यातील (Pune) आकडेवारीनुसार या दंडापैकी तब्बल 80 टक्के प्रकरणांमध्ये पुणेकरांनी दंडच भरलेला नाही.
पुणे : भारतात नव्या कायद्यांनुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास (Traffic Rule) मोठमोठे दंड करण्याची तरतुद करण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील (Pune) आकडेवारीनुसार या दंडापैकी तब्बल 80 टक्के प्रकरणांमध्ये पुणेकरांनी दंडच भरलेला नाही. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांनी दंड न भरल्याचं बोललं जातंय. 2019 मध्ये दंड न भरणाऱ्यांचं प्रमाण 64.34 टक्के होतं. हेच प्रमाण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 79.59 टक्के झालं (Traffic Fine of 80 percent not payed by Pune Citizens during 2020 year).
पुण्याचे ट्रॅफिक पोलीस उपायुक्त (DCP) राहुल श्रीराम यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, वाहतुकीचे नियम (Traffic Rule) तोडण्याच्या घटनांमध्ये सध्या घट झालीय. 2019 आणि 2018 च्या तुलनेत 2020 मध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन कमी झालं आहे.
60 कोटींचं नुकसान
राहुल श्रीराम म्हणाले, “आतापर्यंत 80 टक्के लोकांनी वाहतूक पोलिसांनी केलेला दंड भरलेला नाही. या दंडाची रक्कम जवळपास 59 कोटी 96 लाख 12 हजार 400 रुपये इतकी आहे. यावर्षी केवळ 15 कोटी 37 लाख 10 हजार 853 रुपये दंड जमा झाला आहे.” लॉकडाऊनमुळे वाहतुकीवरच निर्बंध असल्याने यंदा मागील 2 वर्षांच्या तुलनेत वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या कमी घटना घडल्या. असं असलं तरी दंड न भरलेल्या प्रकरणांची संख्या कायम आहे. 2019 मध्ये 14 लाख 67 हजार 211 प्रकरणांमध्ये दंडच भरला गेला नाही.
वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन सिस्टमसाठी आवश्यक डेटा नसल्यानं माहिती पाठवण्यात अडचणी येत असल्याचं म्हटलंय. बरीच माहिती गायब असल्याचीही तक्रार केली जात आहे. यासाठी वाहतूक पोलीस आरटीओला दोषी धरत आहेत, तर आरटीओ अधिकाऱ्यांकडे यासाठी वेगळीच कारणं आहेत. दरम्यान, 2007 च्या आधी खरेदी केलेल्या वाहनचालकांची माहिती डिजीटल स्वरुपात उपलब्धच नाहीये.
हेही वाचा :
राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’, ग्रामपंचायतसाठी कंबर कसली, दोन दिवस पुण्यात तळ
मुंबईसह महाराष्ट्र गारठणार? पुणेकरांसाठीही हवामान खात्याचा इशारा
पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय
Traffic Fine of 80 percent not payed by Pune Citizens during 2020 year