Pune rain : चेंबरमधला कचरा काढत पावसाच्या पाण्याला करून दिली वाट, वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

प्रशासनाकडून वेळेवर कार्यवाही होत नसल्याने नागरिका नाराजीही व्यक्त करत आहेत. अशावेळी प्रशासनाची वाट न पाहता वाहतूक पोलीस कर्मचारीच पाण्याचा वाट करून देताना दिसून आला.

Pune rain : चेंबरमधला कचरा काढत पावसाच्या पाण्याला करून दिली वाट, वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल
चेंबरमधील कचरा काढताना वाहतूक पोलीस कर्मचारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 12:02 PM

अभिजीत पोते, पुणे : रस्त्यावरील चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढून वाहतुकीची कोंडी दूर करतानाचा पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काल पुण्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला. यावेळी ठिकठिकाणी पाणी साचले होते. अनेक ठिकाणचे चेंबर्स कचऱ्यामुळे बंद झाले होते. त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी आणि वाहनांची रांग असे चित्र पाहायला मिळाले. यात आता स्वत: वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने चेंबरमधील कचरा काढत वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विमाननगर (Viman nagar) चौक येथील हा व्हिडिओ आहे. यात वाहतूक पोलीस स्वतः चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढून पाण्याला वाट करून देताना पाहायला मिळत आहे. पुणेकरांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आणि व्हायरल करत (Viral) अशावेळी देखील पोलीसच कामाला येतात, असे म्हटले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष?

पुण्यात काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे जवळपास सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते. वाहतुकीला यामुळे अडथळा निर्माण झाला. काही परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची तर मोठी गैरसोय यामुळे झाली आहे. पाऊस सुरू झाल्यावर आमच्या घरात दरवेळी पाणी येते. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. अद्यापही अनेक परिसरांत पाणी आहे. प्रशासनाकडून वेळेवर कार्यवाही होत नसल्याने नागरिका नाराजीही व्यक्त करत आहेत. अशावेळी प्रशासनाची वाट न पाहता वाहतूक पोलीस कर्मचारीच पाण्याचा वाट करून देताना दिसून आला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल

चौकांमध्ये मोठी गर्दी

पाऊस नेमका संध्याकाळच्या वेळी पडल्याने चौकांमध्ये मोठी गर्दी आणि कोंडी झालेली पाहायला मिळाली. त्यात अधिक भर पडू नये, म्हणून या कर्मचाऱ्यांने चंबरचे झाकण आणि त्याबाजूला असलेला कचरा स्व:च्या हाताने काढला. पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने काहीसा वेळ पाणी निचरण्यास लागला. मात्र हे करत असतानाचा व्हिडिओ मात्र सर्वत्र व्हायरल झाला आहे. अशावेळी प्रशासन नाही, तर पोलीसच मदतीला येतात, अशी भावना व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.