पुणे, मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट, प्रवाशांना काय काय सुविधा मिळणार

Pune News : रेल्वे मंत्रालयाने एकाच वेळी अनेक पातळीवर सुधारणा सुरु केल्या आहेत. रेल्वे वाढवल्या जात असताना रेल्वे स्थानके अद्यावत केली जात आहेत. त्यात पुणे, मुंबई रेल्वे स्थानकांचा समावेश केला आहे.

पुणे, मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट, प्रवाशांना काय काय सुविधा मिळणार
pune railway
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 2:35 PM

योगेश बोरसे, पुणे | 24 जुलै 2023 : भारतीय रेल्वेत मोठ्या सुधारणा होत आहे. नवीन नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहे. वंदे भारतसारखी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु झाली आहे. बुलेट ट्रेन सुरु करण्याचे काम सुरु आहे. लोकलमध्ये बदल केला जात आहे. जुन्या लोकलची जागा वंदे लोकल घेणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांचाही विकास केला जात आहे. रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा निर्माण केल्या जात आहे. आता राज्यातील पुणे, मुंबईसह विविध रेल्वे स्थानकावर नवीन योजना सुरु होणार आहे. त्यामुळे ही स्थानके बदलणार आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश

राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. त्यामध्ये पुणे, मुंबईसह राज्यातील इतर काही रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश केला गेला आहे.

काय मिळणार सुविधा

रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच स्थानक परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रेल्वे स्थानकांचा प्रवेशद्वार अधिक चांगला केला जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षागृहे अधिक चांगली केली जाणार आहे. यासाठी नवीन आराखडा तयार होणार आहे. स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मोफत वाय-फाय किऑस्कची उभारणी केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

रेल्वे स्थानकापासून रेल्वेपर्यंत बदल

रेल्वेने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. रेल्वे अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला जात आहे. ओडिशाच्या बालासोरजवळ तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकून रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातानंतर या पद्धतीचे कोणतेही अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे येत्या काही काळात रेल्वे स्थानकांपासून रेल्वेपर्यंत अनेक बदल दिसणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.