PM Modi visit maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली जाणारी तुकाराम पगडी आहे खास! काय वैशिष्ट्य? जाणून घ्या…

आधीदेखील पुण्यात मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून पगडी देण्यात आली होती. या पगडीवर शिवमुद्रा होती. मात्र त्याला आक्षेप घेतला गेल्याने ती काढण्यात आली होती आणि आणखी एक पगडीशी संबंधित बाब समोर आली आहे.

PM Modi visit maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली जाणारी तुकाराम पगडी आहे खास! काय वैशिष्ट्य? जाणून घ्या...
नरेंद्र मोदींना देण्यात येणारी तुकाराम पगडीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 2:26 PM

देहू, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या पुण्यातल्या देहूमध्ये येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच आता त्यांचा दौरा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे मोदींना देण्यात येणाऱ्या पगडीवरच्या ओळी आता देहू संस्थानने बदलल्या आहेत. उद्या म्हणजे 14 तारखेला मोदी हे देहू येथे तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या (Sant Tukaram Maharaj shila mandir) लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावणार आहेत. त्यावेळी तुकाराम पगडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठीची खास पगडी पुण्यामध्ये बनवण्यात येत होती. या पगडीवरती (Turban) लिहिलेल्या ओळी मात्र आता देहू संस्थानने बदललेल्या आहेत. सुरुवातीला या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या ओळी होत्या. आता या पगडीवर ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशा ओळी टाकण्यात आल्या आहेत.

दुसऱ्यांदा घडले

या आधीदेखील पुण्यात मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून पगडी देण्यात आली होती. या पगडीवर शिवमुद्रा होती. मात्र त्याला आक्षेप घेतला गेल्याने ती काढण्यात आली होती आणि आणखी एक पगडीशी संबंधित बाब समोर आली आहे. पगडीवरील ओळी बदलण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी विश्वस्त नितीन महाराज, तुषार भोसले आदींनी पत्र पाठवत एक चांगले डिझाइन असलेली पगडी बनवून द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार पगडी आणि उपरणे तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. यातील काही अभंग हिंदीतूनही असणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पगडीवरील ओळीही बदलण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

वापरले रेशीम कापड

उपरणे पंतप्रधानांना पगडीसोबत घातले जाणार आहे. त्यासोबतच टाळ आणि तुकाराम महाराजांच्या आवडत्या चिपळ्याही असणार आहेत. पगडीला 10 ते 12 मीटर रेशमी कापड वापरले आहे. याचा रंग नैसर्गिक म्हणजेच त्याकाळी जसा होता, तसाच वापरला आहे. याला सजावट सोने, चांदी, हिऱ्यांची न करता वारकरी संप्रदायाला आवडणाऱ्या तुळशीच्या माळांनी केली आहे, अशी माहिती देण्यात आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.