दिघीत सापडले तब्बल 12 डुक्कर बॉम्ब! दोन महिन्यापूर्वी बालिकेचा झाला होता मृत्यू

दिघी (Dighi) परिसरात पुन्हा 12 डुक्कर बॉम्ब (Pig bombs) सापडले आहेत. या पूर्वी याच परिसरात डुक्कर बॉम्ब खेळताना 5 वर्षीय मुलीचा मृत्यू (Dead) झाला होता. त्याचवेळी या परिसरात 30 डुक्कर बॉम्ब आढळून आले होते.

दिघीत सापडले तब्बल 12 डुक्कर बॉम्ब! दोन महिन्यापूर्वी बालिकेचा झाला होता मृत्यू
दिघी परिसरात सापडलेले डुक्कर बॉम्बImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 9:36 AM

पिंपरी चिंचवड : दिघी (Dighi) परिसरात पुन्हा 12 डुक्कर बॉम्ब (Pig bombs) सापडले आहेत. या पूर्वी याच परिसरात डुक्कर बॉम्ब खेळताना 5 वर्षीय मुलीचा मृत्यू (Dead) झाला होता. त्याचवेळी या परिसरात 30 डुक्कर बॉम्ब आढळून आले होते. त्यावेळी दोन आरोपींना दिघी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वीची घटना वडमुखवाडी, चऱ्होली या परिसरात घडली होती. त्यावेळी डुक्कर बॉम्ब आढळून आले होते. पोलिसांना याची कल्पना देण्यात आल्यानंतर त्याचा अधिक तपास करण्यात आला होता. आतादेखील त्याच परिसरात शुक्रवारी डुक्कर बॉम्ब आढळले आहेत. डुक्कर मारण्यासाठी या बॉम्बचा उपयोग होतो. दरम्यान, हा फेब्रुवारी महिन्यातील बॉम्ब असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुपारीएवढ्या आकाराचे बॉम्ब

साधारणपणे सुपारीएवढ्या आकाराचे हे बॉम्ब असतात. त्याला दोरा गुंडाळलेला असतो. हीच वस्तू फोडत असताना चऱ्होली परिसरातील अलंकापुरम सोसायटीजवळच्या गाईच्या गोठ्याजवळ या डुक्कर बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात आरती गवळी (वय 4) या मुलीचा मृत्यू झाला होता. तर इतर दोन मुले गंभीर जखमी झाली होती.

अधिक तपास सुरू

आताही याच परिसरात डुक्कर बॉम्ब सापडले असून याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी शोध घेतला असता जवळपास 12 बॉम्ब सापडले आहेत. हे बॉम्ब त्याचवेळी ठेवण्यात आले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास सुरू आहे.

आणखी वाचा :

Mumbai | धक्कादायक! परळ डेपोजवळ बेशुद्धावस्थेत आढळले, मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Nashik CCTV | विनाहेल्मेट पेट्रोल का दिले नाही, नाशकात बाईक चालकाचा पंपावर राडा, कर्मचाऱ्यांशी बाचाबाची

Wardha Suicide : एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायाची गळफास घेत आत्महत्या

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.