Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी दोन पूल एकत्र जोडणार ; NHAI चा महानगरपालिकेला अहवाल सादर

नवले पूल, नऱ्हे, वडगाव येथील अपघात टाळण्यासाठी NHAI कडून महापालिकेकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये सर्व्हिस रस्ताची कामे, महामार्गावरील पंक्चर काढणे,अतिक्रमण काढणे अश्या आपत्कालीन उपययोजना सुचवण्यात आल्या आहेत. पुलावरील अपघाताची धोकादायक ठिकाण ओळखून रबर स्ट्रीप बसवण्यात येणार आहेत.

पुण्यातील नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी दोन पूल एकत्र जोडणार ; NHAI चा महानगरपालिकेला अहवाल सादर
NHAI
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 11:14 AM

पुणे – पुण्यातील नवले पुल ( Navale bridge)परिसरातील अपघाताचं वाढते प्रमाण रोखण्यासाठी आता दोन पूल एकत्र जोडले जाणार आहेत. वडगाव पूल आणि नवले पूल दरम्यान नव्याने एक पूल बांधून राष्ट्रीय महामार्गला जोडला जाणार असल्याचा अहवाल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) महानगरपालिकेला(PMC) दिला आहे. नवले पूल, नऱ्हे, वडगाव येथील अपघात टाळण्यासाठी NHAI कडून महापालिकेकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्येसर्व्हिस रस्ताची कामे, महामार्गावरील पंक्चर काढणे,अतिक्रमण काढणे अश्या आपत्कालीन उपययोजना सुचवण्यात आल्या आहेत. पुलावरील अपघाताची धोकादायक ठिकाण ओळखून रबर स्ट्रीप बसवण्यात येणार आहेत. याबरोबच सर्व्हिस रोडचं काम युद्धपातळीवर केलं जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरींची घेणार भेट नवले पुलावरील वाढते अपघात रोखण्यासाठी NHAI चे अधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतच बैठक घेतली. नवले पूल आणि महामार्गाचा एकत्रित अहवाल तयार केला जाणार आहे. महामार्गाचं काम एन एच आयने रखडवल्यामूळे अपघात होतायेत असा आरोप आहे. अपघातांच प्रमाण वाढल्यानं रस्त्यावरुन प्रवास करणं देखील धोकादायक बनलं आहे. महापालिका आणि नितीन गडकरी एकत्रित बसून याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

नवले पूल ‘डेथ झोन’ बनला 

मुंबई बंगळुरु बाह्य वळण महामार्ग असलेल्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या महामार्ग मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. 2014 पासून या ठिकाणी झालेल्या अपघातात 56 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. सातत्त्याने सुरु असलेल्या भीषण अपघातांच्या मालिकांनंतर महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागिरक करताहेत. प्रशासन फक्त काम करत असल्याचे भासवत आहे. तसेच, स्थानिक लोक प्रतिनिधी फक्त पाहाणी करुन आदेश देण्यात धन्यता मानताना दिसत आहे. परंतु त्यावरील ठोस उपयोजना झाली आहे की नाही याकडे मात्र सर्रासपणे डोळे झाक करत असल्याचं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

2020-2021 वर्षांत झालेले अपघात

  • नेहमी अपघात होणारे अंतर चार किलोमीटर (कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल
  • छोटे-मोठे 42 अपघात
  •  22 मृत्यू
  •  7 ब्लॅक स्पॉट
  •  40 हून अधिक जखमी
  •  60 हुन अधिक वाहनांचे नुकसान
  •  मोठे अपघात 16, मृत्यू 18
  •  2014 पासून एकूण मृत्यू 56

अवजड वाहने व तीव्र उतारामुळे अपघात

कात्रज नवीन बोगद्यपासून नवले पुलापर्यंत अतिशय तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग वाढतो. वेग वाढल्यानंतर अवजड वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडत आहेत. त्याचप्रमाणे नवले पुलाचा उतार आणि वडगाव पुलावर जाताना असणारा चढ तसेच विश्वास हॉटेल समोर असणारे पंचर अतिशय धोकादायक ठरत आहेत. अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे दिसून आले आहेत. तसेच, चालकांनी देखील वाहने जबाबदारीने चालवावीत, महामार्गाच्या नियमांचे पालन करावे, असं महामार्ग प्रशासन आणि पोलिसांच म्हणणं आहे.

Nitish Bharadwaj Separated From Wife: महाभारताचा कृष्ण स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही, 12 वर्षानंतर पत्नीशी काडीमोड

Pune Crime | बंद घराचं कुलुप तोडून चोरी, साडेनऊ लाखांचा ऐवज लांबवला

Nagpur Crime | नागपुरातील अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; दोन वर्षांनी परतली ती बाळासहच!

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.