पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, बैठकीत किती जण राहिले अनुपस्थित

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी दोन गट निर्माण झाले. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट निर्माण झाले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हे स्पष्ट झाले.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, बैठकीत किती जण राहिले अनुपस्थित
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 10:48 AM

योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी दोन गट तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यांसोबत अनेक किती जण आले आहेत? याचा खुलासा अद्याप झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचे उत्तर मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून बुधवारी बोलवण्यात आलेली बैठक महत्वाची आहे. या बैठकीनंतर कोण-कोणासोबत हे स्पष्ट होणार आहे. परंतु मंगळवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्या निर्णयास अनेकांचे समर्थन नसल्याची माहिती समोर येत आहे.

किती जण आहेत शरद पवार यांच्यासोबत

पुणे शहर राष्ट्रवादीमधील एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी शहर कार्यकारीणीच्या बैठकीला ४४ पैकी फक्त २३ माजी नगरसेवक उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे उर्वरित जण अजित पवार यांच्या गटात जाऊ शकतात. तसेच पुणे शहरातील दोन्ही आमदारांची बैठकीला दांडी मारली होती. यामुळे ते सुद्धा अजित पवार यांच्यासोबत असतील, असे म्हटले जात आहे. यामुळे शरद पवार यांच्यासोबत पुणे शहरातील २३ माजी नगरसेवक असतील, असे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

त्या लोकांची नावे पाठवणार

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारीणीला उपस्थित नसणाऱ्यांची नावे पक्ष नेतृत्वाकडे पाठवली जाणार आहे, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. तसेच बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी पुणे शहरातून अनेक जण जाणार आहेत. शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी पुण्यातून पदाधिकारी जाणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.