Video : महिलादिनी रणरागिणींची कामगिरी, गावातील दोन दारु अड्डे उद्धवस्त
जागतिक महिला दिनी शिरोळच्या रणरागिणींनी अजोड कामगिरी केलीय. शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट येथील महिला दिनादिवशी महिलांनी दोन दारु अड्डे उध्वस्त केले. | Two liquor Shop demolished
इचलकरंजी : जागतिक महिला दिनी (International Womens Day) शिरोळच्या रणरागिणींनी अजोड कामगिरी केलीय. शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट येथील महिला दिनादिवशी महिलांनी दोन दारु अड्डे उध्वस्त केले. (Two liquor dens in the village were demolished By Shirol Womens)
गावठी दारुमुळे संसार उध्वस्त होण्याचे प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर रणरागिणी आक्रमक झाल्या. महिला दिनादिवशी त्यांनी उभी बाटली आडवी करण्याचं ठरवलं.
सोमवारी सायंकाळी सुमारास महिला दिनाचा कार्यक्रम आटपला. बऱ्याच दिवसांपासून महिलांचा दोन दारु अड्डे उध्वस्त करण्याचा मनसुबा होता. अखेर महिला दिनाच्या संध्याकाळी महिलांनी गावठी दारुचे अड्डे उध्वस्त केले. अब्दुललाट मधील माळभाग व झेंडा चौकातील तळ्याशेजारील दारू अड्डा उध्वस्त करून सर्व साहित्याची जाळपोळ केली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सायंकाळी पाच वाजता अब्दुललाट येथे श्रमशक्ती परिवार व विदयोदय मुक्तांगण परिवार यांच्यावतीने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. झेंडा चौकजवळ असलेल्या साखर शाळेत ऊस तोडणी महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम झाल्यानंतर महिलांनी आक्रमक भूमिका घेत गावात सुरू असणारे दोन्ही दारु अड्डे उध्वस्त केले.
पाहा व्हिडीओ :
(Two liquor dens in the village were demolished By Shirol Womens)
हे ही वाचा :
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा! गुगल 10 लाख भारतीय ग्रामीण महिला उद्योजकांना करणार मदत