Sankashti Chaturthi : द्राक्षांमध्ये गणराज विराजमान! Dagdusheth Ganpati मंदिरात तब्बल दोन हजार किलो द्राक्षांची आरास
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) संकष्टी चतुर्थीनिमित्त (Sankashti Chaturthi) आज (दि. 21 मार्च) गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव (Grape festival) साजरा करण्यात येत आहे.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) संकष्टी चतुर्थीनिमित्त (Sankashti Chaturthi) आज (दि. 21 मार्च) गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव (Grape festival) साजरा करण्यात येत आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली जात आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात ही आकर्षक आरास करण्यात आली आहे. सकाळी ही आरास पूर्ण झाली असून भाविकांना पाहण्यासाठी खुली झाली आहे. भाविकांनीही मंदिरात गर्दी केली आहे. दिवसभर भाविकांची मांदियाळी मंदिरात असणार आहे.
गरजूंना तसेच भाविकांना वाटली जाणार द्राक्षे
सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून येत आहे. ही द्राक्षे न धुता ही खाता येणारी असून पूर्णत नैसर्गिक, रसायनविरहित आहेत. ती नंतर ससून रुग्णालयातील रुग्णांना, गरजूंना तसेच भाविकांना वाटली जाणार आहेत.
Sankashti Chaturthi : द्राक्षांमध्ये गणराज विराजमान! Dagdusheth Ganpati मंदिरात तब्बल दोन हजार किलो द्राक्षांची आरास पाहा व्हिडिओ – #grapes #dagdusheth #Pune #sankashtichaturthi #Video अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/P9xb2MbpM9
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
प्रसन्न वाटत आहे
आज संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनीही गर्दी केली आहे. इथली हिरवळ पाहून मन प्रसन्न झाल्याचे भाविकांनी सांगितले. मंदिर परिसरातले वातावरण अत्यंत प्रसन्न झाले असून तिथून जावेसे वाटत नाही, अशा प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या आहेत.